Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: कौशल्यांवर आधारित करिअर मॅपिंग

PUBLISH DATE 11th June 2022

मूलभूत अभ्यासक्रमाबरोबरच पूरक कौशल्यांवर आधारित करिअर मॅपिंग तसेच व्यावसायिक आणि उद्योजकीय कौशल्यांवर आधारित करिअर मॅपिंग या दोन स्वतंत्र रचना आहेत.

तंत्रज्ञान कौशल्य आणि माहिती तंत्रज्ञान कौशल्य यांचा मूलभूत अभ्यासक्रमाशी रोजगार क्षमतेच्या दृष्टीने असणारा उपयोग हा करिअर मॅपिंगमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे.

दहावी-बारावीच्या टप्प्यावर अभ्यासक्रमाची निवड करताना तो पूर्ण केल्यानंतर सर्वाधिक प्रकारचे पर्याय उपलब्ध असतील अशा पद्धतीने अभ्यासक्रम शाखेची निवड करणे महत्त्वाचे आहे. स्पर्धेच्या युगात अनेक पर्यायांचा अभ्यासक्रम हा पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उपयुक्त ठरतो आहे.

बदलत्या काळानुसार चौथी औद्योगिक क्रांती आणि येणाऱ्या पाचव्या औद्योगिक क्रांतीच्या कौशल्यांचा उपयोग हा आपण निवडलेल्या मूलभूत अभ्यासक्रमांशी निगडित असणे हा विचार उज्ज्वल भवितव्यासाठी गरजेचा आहे. आपल्या मूलभूत संगणकीय ज्ञानाला कौशल्यांची जोड देताना ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’,‘अॅग्युमेंटेड रिअॅलिटी’,‘थ्रीडी प्रिंटिंग’, ‘पर्सनल क्लाऊड कॉम्प्युटिंग’,‘ॲन्ड्रॉइड-विंडोज ॲप डेव्हलपमेंट’, ‘डेटा सायन्स’, ‘डेटा अ‌ॅनालायटिक्स’ आदी अद्ययावत कौशल्यांच्या अभ्यासक्रमांची निवड करणे म्हणजेच करिअर मॅपिंग होय.

चाकोरीबाहेरचे अभ्यासक्रम

विज्ञान, कला, वाणिज्य या शाखांमधील अकरावी, बारावी बरोबरच बायफोकल, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रम, अल्प मुदतीचे व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच तंत्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा अनेक अभ्यासक्रमातील संधी उपलब्ध आहेत. चाकोरी बाहेरील अनेक अभ्यासक्रम निवडीमध्ये मूलभूत अभ्यासक्रमांची जोड महत्त्वाची आहे. आजचे युग अनेक क्षेत्रांमध्ये ‘स्पेशलायझेशन’चे असल्याने निवड केलेल्या शाखांमधील उपशाखांच्या विस्ताराची माहिती योग्यवेळी घ्यायला हवी. अभ्यासक्रम निवडीबरोबरच प्रवेश प्रक्रियेची तांत्रिक माहितीसुद्धा महत्त्वाची आहे. अनेक अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑनलाइन प्रक्रियेद्वारे तसेच ‘एकत्रित पद्धतीने’ होत असल्याने याची सर्वंकष माहिती निर्णय प्रक्रियेत गरजेची आहे. कृषीक्षेत्रातील डेअरी मॅनेजमेंट, ॲनिमल हजबंडरी, फार्म मॅनेजमेंट, क्रॉप सायन्स आदी प्रमाणपत्र आणि पदविका तसेच अन्य अभ्यासक्रमांची माहिती महाराष्ट्रातील अनेक कृषी विद्यापीठांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

उपलब्ध संधी

कौशल्यावर आधारित करिअर मॅपिंगची प्रक्रिया ही काळानुरूप सातत्याने बदलत आहे. त्यामुळेच अद्ययावत तंत्रज्ञान कौशल्य, मूलभूत ज्ञान, पूरक कौशल्याची जोड आणि बदलणाऱ्या व्यावसायिक उपलब्धतेच्या संधी यांचा एकत्रित विचार करिअर मॅपिंगच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्वाचा आहे. क्लिनिकल न्यूट्रिशन, उच्च तंत्रज्ञान शेतीशास्त्र, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधील क्लाऊड टेक्नॉलॉजी, बायोइंन्फरमेटिक्स, डिजिटल मार्केटिंग, हॉस्पिटॅलिटी, उपवैद्यकिय शाखा, मूलभूत विज्ञान, फूड सायन्स, फार्मसी, दंतवैद्यक, नर्सिंग, वैद्यकीय प्रयोगशाळा शास्त्र, फिजिओथेरपी, मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी, डायलिसिस तंत्रज्ञान, रेडिओलॉजी आदी शाखा भविष्यातील उज्ज्वल क्षेत्रे म्हणून गणली जात आहेत. अभ्यासक्रम आणि त्यानुसार रोजगाराची परिमाणेही वेगवेगळी होऊ लागली आहेत. त्यामुळेच पूरक कौशल्य निवडीचे मोठे आव्हान युवकांपुढे आहे त्यामुळेच करिअर मॅपिंगला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.

अनेक कौशल्यांवर आधारित आंतरशाखीय अभ्यासक्रम (इंटर डिसिप्लिनरी कोर्सेस), परिवर्तनीय अभ्यासक्रम (ट्रान्सडीसीप्लीनरी कोर्सेस) तसेच बहुविध कौशल्यांचे अभ्यासक्रम (मल्टी डिसिप्लिनरी कोर्सेस) या बाबतची सर्व माहिती विद्यार्थी पालकांनी घेऊन योग्य निवड करणे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे कारण याच बदलांवर काल, आज आणि उद्याचे करिअर मॅपिंग मोठ्या प्रमाणात परिवर्तनीय राहणार आहे. या शैक्षणिक परिवर्तनाचा वेग हा विद्यार्थ्यांच्या भावी काळात अनेक स्पर्धा निर्माण करणार आहे.

करिअर मॅपिंगमध्ये दहावी-बारावीच्या स्तरावर कौशल्यांची निवड करताना करिअर विषयक कल आणि छंद विषय कल यांचे आकलन अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी विशेष आहे. विविध कसोट्यांद्वारे निश्चित होणारा करिअर विषयक कल आणि विविध विषयात विद्यार्थ्याने मिळविलेले मार्ग यांचे तुलनात्मक विश्लेषण हे विद्यार्थ्याच्या पुढील अभ्यासक्रम निवडीसाठी योग्य ठरते आहे त्यामुळेच करिअर मॅपिंगपूर्वी कल निश्चिती होणे गरजेचे आहे.

स्थानिक स्तरावर आवश्यक असणारी रोजगार क्षमता आणि कौशल्ये ही आंतरराष्ट्रीय परिमाणांपेक्षा पूर्णतः वेगळी असल्याने नोकरीचे कार्यक्षेत्र निवडताना तसेच उपलब्ध संधींचा विचार करताना, कौशल्य निवड ही करिअर मॅपिंगसाठी महत्त्वाची ठरते. ग्रामीण भागातील व्यावसायांसाठीची कौशल्य निकड ही पूर्णता: वेगळी आहे त्यामुळेच कौशल्य निवडीची प्रक्रिया ही करिअर मॅपिंगसाठी महत्त्वाची आहे.

लेखक- डॉ. दीपक ताटपुजे

 

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी-पालक संवाद २०२२: कौशल्यांवर आधारित करिअर मॅपिंग
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: कौशल्यांवर आधारित करिअर मॅपिंग
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: कौशल्यांवर आधारित करिअर मॅपिंग
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: कौशल्यांवर आधारित करिअर मॅपिंग
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: कौशल्यांवर आधारित करिअर मॅपिंग
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: कौशल्यांवर आधारित करिअर मॅपिंग
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: कौशल्यांवर आधारित करिअर मॅपिंग
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: कौशल्यांवर आधारित करिअर मॅपिंग
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: कौशल्यांवर आधारित करिअर मॅपिंग
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: कौशल्यांवर आधारित करिअर मॅपिंग
28th November 2023

Career In Railways