Schools

Schools

दहावी-बारावीच्या मार्कशीटमधील ‘नापास’ शेरा विषयी महत्वपूर्ण बदल

PUBLISH DATE 5th December 2019

राज्य सरकारने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी ‘कौशल्य सेतू कार्यक्रम’ योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. परिणामी, दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा हद्दपार होणार आहे.

त्याऐवजी नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाणार आहे.

महाराष्ट्रा शासनाचा हा निर्णय यापूर्वी केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित होता. मात्र नुकतंच महाराष्ट्र शासनाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने जारी केला असून तसा प्रस्ताव राज्य शिक्षण मंडाळाकडे पाठवण्यात आला आहे.

दहावी आणि बारावीचं शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचं व जीवनाला वळण देणारा एक मोठा टप्पा असतो. या टप्प्यावर अनुत्तीर्ण झाल्यास समोरच्या भविष्याच्या वाटचालीत अडथळे निर्माण होतात. अशा तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांकरिता कौशल्य सेतू कार्यक्रम योजना राबवण्यात येणार आहे.

यापूर्वी शिक्षण विभागाने 27 सप्टेंबर 2018 रोजी शासन निर्णय जारी करुन दहावी परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा देण्याचं नमूद केलं आहे. यानंतर दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘एटीकेटी’ असा शेरा येत होता.

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------


Related News


दहावी-बारावीच्या मार्कशीटमधील ‘नापास’ शेरा विषयी महत्वपूर्ण  बदल
30th January 2024

MPSOS Result 2023

दहावी-बारावीच्या मार्कशीटमधील ‘नापास’ शेरा विषयी महत्वपूर्ण  बदल
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

दहावी-बारावीच्या मार्कशीटमधील ‘नापास’ शेरा विषयी महत्वपूर्ण  बदल
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

दहावी-बारावीच्या मार्कशीटमधील ‘नापास’ शेरा विषयी महत्वपूर्ण  बदल
27th December 2023

NIOS Result 2023 Out

दहावी-बारावीच्या मार्कशीटमधील ‘नापास’ शेरा विषयी महत्वपूर्ण  बदल
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

दहावी-बारावीच्या मार्कशीटमधील ‘नापास’ शेरा विषयी महत्वपूर्ण  बदल
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

दहावी-बारावीच्या मार्कशीटमधील ‘नापास’ शेरा विषयी महत्वपूर्ण  बदल
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

दहावी-बारावीच्या मार्कशीटमधील ‘नापास’ शेरा विषयी महत्वपूर्ण  बदल
22nd June 2023

JNVST Result 2023