Schools

Schools

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: पहिलीपर्यंत दप्तरच नाही

PUBLISH DATE 28th November 2020

विद्यार्थ्यांच्या वजनाच्या केवळ दहा टक्के इतकेच दप्तराचे वजन असावे आणि त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी अशा सूचना केंद्रीय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या 'स्कूल बॅग धोरण २०२०'मध्ये करण्यात आल्या आहेत.

तर पूर्व प्राथमिक वर्गांना म्हणजेच पहिलीपर्यंत मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझेच नसेल.

इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी एकच वही, तिसरी ते पाचवीसाठी एक वर्गासाठी आणि एक गृहपाठासाठी अशा दोन वह्या तर सहावी ते आठवीसाठी अभ्यासासाठी सुट्टे कागद वापरावेत असे या धोरणात सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांना पाठदुखीचा आजार जडत आहे. याविरोधात देशभरातील पालकांनी तक्रारी केल्या होत्या. हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले होते. यानंतर सन २०१८मध्ये केंद्र सरकारने दप्तराचे आझे किती असावे याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीमध्ये राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर होते. समितीने दिलेल्या अहवालाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आता याची अंमलबजावणी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करावी, अशा सूचना केंद्र सरकारचे सचिव सुनीता शर्मा यांनी दिल्या आहेत.

शाळांचे वेळापत्रक कसे असावे याबाबतही यामध्ये सूचना करण्यात आल्या आहेत. हा मसुदा तयार करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात ३५२ शाळा, २९९२ पालक आणि ३६२४ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये १९ टक्के प्राथमिक शाळांच्या प्रमुखांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन अधिक असल्याचे मान्य केले. तर दररोज न्यावी लागणारी सर्व पाठ्यपुस्तके, वह्या, संदर्भ पुस्तके, क्रीडा आणि अन्य साहित्य, जेवणाचा डबा यामुळे ओझे वाढत असल्याचे पालकांनी या सर्वेक्षणात स्पष्ट केले.

इयत्ता विद्यार्थ्याचे वजन दप्तराचे वजन

  1. पूर्व प्राथमिक १० ते १६ किलो दप्तराविना
  2. पहिली, दुसरी १६ ते २२ किलो १.६ ते २.२ किलो
  3. तिसरी ते पाचवी १५ ते २५ किलो १.५ ते २.५ किलो
  4. सहावी, सातवी २० ते ३० किलो २ ते ३ किलो
  5. आठवी २५ ते ४० किलो २.५ ते ४ किलो
  6. नववी, दहावी २५ ते ४५ किलो २.५ ते ४.५ किलो
  7. अकरावी, बारावी ३५ ते ५० किलो ३.५ ते ५ किलो

अशी होणार अंमलबजावणी

  1. - शिक्षकांनी नियमितपणे विद्यार्थ्यांचे दप्तर तपासावे
  2. - दप्तराचे आझे वाढणार नाही, असे वेळापत्रक आखावे
  3. - वर्गात पाठ्यपुस्तके विभागून देण्याची सुविधा असावी
  4. - पिण्याच्या पाण्याची शाळेत, शिक्षणसंस्थेत सोय करावी
  5. - पाठ्यपुस्तकांची निर्मिती करतानाही वजन मर्यादित ठेवावे

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


स्कूल बॅग पॉलिसी २०२०: पहिलीपर्यंत दप्तरच नाही
30th January 2024

MPSOS Result 2023

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: पहिलीपर्यंत दप्तरच नाही
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: पहिलीपर्यंत दप्तरच नाही
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: पहिलीपर्यंत दप्तरच नाही
27th December 2023

NIOS Result 2023 Out

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: पहिलीपर्यंत दप्तरच नाही
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: पहिलीपर्यंत दप्तरच नाही
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: पहिलीपर्यंत दप्तरच नाही
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: पहिलीपर्यंत दप्तरच नाही
22nd June 2023

JNVST Result 2023