Scholarships

Scholarships

बार्टी मार्फत आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना २०२१

PUBLISH DATE 25th June 2021

दहावीच्या परीक्षेत ९०% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या (SSC Result 2021) अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयांचे अनुदान महाराष्ट्र सरकारतर्फे दिले जाणार आहे.

अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल घटकांतील जे विद्यार्थी दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवतील, त्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी अकरावी व बारावी या दोन वर्षात प्रत्येकी एक लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्यात येणार आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना MH-CET, JEE, NEET यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे. याबाबत विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येणारी मागणी पाहता ही योजना लागू करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले होते. बार्टीच्या ३० व्या नियामक मंडळाची २१ जून रोजी बैठक पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या आत असणे अनिवार्य असणार आहे. तसेच शासकीय सेवेत नोकरीला असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही योजना लागू असणार नाही. उत्पन्नाचा व जातीचा प्रमाणित दाखला देणे अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील लाभार्थी संख्या अमर्यादित असणार आहे! अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या, कमी पगारावर किंवा कंत्राटी स्वरूपात किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार असून, या योजनेची पारदर्शक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांची असणार आहे. या योजनेचा लाभ तळागाळातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवण्यासाठी मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून निश्चितच ही योजना सफल करू, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


बार्टी मार्फत आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना २०२१
8th February 2024

Scholarship Exam

बार्टी मार्फत आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना २०२१
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

बार्टी मार्फत आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना २०२१
15th December 2023

Sarthi Exam

बार्टी मार्फत आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना २०२१
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

बार्टी मार्फत आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना २०२१
22nd November 2023

Scholarships To Study In UK