Jobs

Jobs

स्टेट बँक ऑफ इंडिया क्लर्क भरती २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

PUBLISH DATE 17th May 2021

 भारतीय स्टेट बँक (SBI) ने एसबीआय क्लर्क भरती (SBI Clerk Recruitment) 2021 साठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत एसबीआय क्लर्क भरती 2021 साठी अर्ज केला नसेल, ते आता २० मे २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्जांची मुदत सोमवारी १७ मे २०२१ रोजी संपत होती.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) क्लर्क भरती प्रक्रियेंतर्गत ज्युनियर असोसिएटची एकूण ५२३७ पदे भरली जाणार आहेत. योग्य आणि इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी नोटिफिकेशनची डायरेक्ट लिंक पुढे देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण तारखा

  1. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख - २७ एप्रिल २०२१
  2. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत - २० मे २०२१
  3. प्री एक्झाम ट्रेनिंग कॉल लेटर - २६ मे २०२१
  4. पूर्व परीक्षा - जून २०२१
  5. मुख्य परीक्षा - ३१ जुलै २०२१

आवश्यक पात्रता
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी असणे अनिवार्य. जे विद्यार्थी आता अंतिम वर्षाला आहेत, मात्र अजून अंतिम परीक्षा झालेली नाही, ते देखील अर्ज करू शकतात. मात्र त्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र १६ ऑगस्ट २०२१ पूर्वी मिळायला हवे.

वयोमर्यादा
२० ते २८ वर्षे. उमेदवारांचा जन्म २ एप्रिल १९९३ पूर्वी आणि १ एप्रिल २००१ नंतरचा नसावा. वयाची गणना १६ ऑगस्ट २०२१ या तारखेनुसार होईल.

वेतन - १७,९०० रुपये - ४७,९२० रुपये. बेसिक पे १९,९०० रुपये

निवड प्रक्रिया

सर्वात आधी ऑनलाइन पूर्व परीक्षा घेतली जाईल. यात उत्तीर्ण होणारे उमेदवार ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल.
पूर्व परीक्षा एक तास कालावधीची असेल. यात इंग्रजी भाषा, संख्यात्मक योग्यता आणि तार्किक क्षमतेशी संबंधित एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. पूर्व परीक्षा १०० गुणांची असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा होईल.

SBI क्लर्क भरतीच्या अर्जांसाठी मुदतवाढ दिल्याची माहिती देणारे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

SBI Clerk Recruitment 2021 भरतीसंबंधीचे संपूर्ण नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.