Scholarships

Scholarships

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप

PUBLISH DATE 19th April 2021

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप' या नावाने ४०० युरोची ही स्कॉलरशिप इटलीतील सॅमनिटे राज्यातील दहा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

विद्यापीठस्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाणार असून याकरिता संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत.

बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार असून पुढील दहा वर्षे १०० मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
ग्लोबल टीचर पुरस्कार २०२० चे विजेते रणजितसिंह डिसले यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कार रकमेतील म्हणजेच सात कोटींपैकी अर्धी रक्कम म्हणजेच साडे तीन कोटींची रक्कम ९ देशातील शिक्षकांना वाटून दिली होती. इटलीचे कार्लो मझुने हे त्यापैकीच एक होत.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत रणजितसिंह डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.

पाठय़पुस्तकातल्या प्रत्येक धडय़ाला एक स्वतंत्र ‘क्यूआर’ किंवा क्विक रिस्पॉन्स कोड दिल्यामुळे कोणालाही शाळेबाहेर कुठेही आणि केव्हाही तो धडा श्राव्य किंवा दृक्-श्राव्य माध्यमातून समजून घेणे सोपे झाले. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज ११ देशांतील दहा कोटीहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धती च्या माध्यमातून ते १५० हून अधिक देशातील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात.

-----------------------------------------------------------------------------------

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur
And VidyarthiMitra.Org
    Organise 

"Exam Warriors" - Practice Exam 2021 based on the new syllabus.

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur and Vidyarthi Mitra (www.VidyarthiMitra.org) are jointly conducting practice exams for 10th and 12th class students as per the new syllabus of the board.

This exam will be held in your school and college. Registration for participation should be done by following the link below.

Registration and participation is free and students can check their level of study and model answer sheets will also be given to the students through this practice test.

Registration link: https://bit.ly/3t8zpD0

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
8th February 2024

Scholarship Exam

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
15th December 2023

Sarthi Exam

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
22nd November 2023

Scholarships To Study In UK