Civil Services

Civil Services

यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी

PUBLISH DATE 14th January 2025

या लेखात आपण यूपीएससी पूर्वपरीक्षेतील GS (General Studies) पेपरची स्ट्रॅटेजी जाणून घेणार आहोत. यूपीएससी पूर्वपरीक्षेतील ॅर पेपरच्या आधारे मुख्य परीक्षेसाठीची गुणवत्तायादी जाहीर होते. पूर्वपरीक्षेचा ‘आत्मा’ म्हणजे ‘GS’!

एखाद्या पेपरची स्ट्रॅटेजी ठरविताना त्या पेपरचा अभ्यासक्रम व त्यासाठीचे संदर्भसाहित्य जाणून घेणे महत्त्वाचे असते, जे आपण आधीच्या लेखात पाहिले आहे. त्याचबरोबर गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका समजून त्यातील प्रश्नांचे विषयवार वितरण समजून घ्यायला हवे.

विषय                           २०२४    २०२३    २०२२    २०२१

राज्यघटना                    १५          १२        ९         १७

इतिहास                        १२          १३       १५         २०

भूगोल                          १८          १६        ८          १४

पर्यावरण                       १५          १२       २२          १६

अर्थशास्त्रत्त                    १४          १४       १७          १५

विज्ञान व तंत्रज्ञान १३ १५ ११ १२

Misc (आंतरराष्ट्रीयसंस्था, १३ १८ १८ १५

कायदे इ.)

नोट : चालू घडामोडीतील प्रश्न हे ज्या विषयाशी संबंधित आहेत त्यातच गृहीत धरले आहेत.

या वितरणावरून एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे ती म्हणजे, जरी एखाद्या विषयातील प्रश्न एखाद्या वर्षी कमी – अधिक झाले तरी पुढील वर्षी त्यात बदल होऊ शकतो.उदा. भूगोलात सन २०२२ मध्ये केवळ ८ प्रश्न विचारले गेले तरसन २०२३ व २०२४ मध्ये ही प्रश्नसंख्या १६ व १८ वर गेली.यातून हा निष्कर्ष निघतो की सर्व विषयांना आपण समान न्याय द्यायला हवा. त्यातही विषयवार विश्लेषणातून आपण आगामी लेखांत सूक्ष्मातिसूक्ष्म बाबी समजून घेवू.

प्रश्नांच्या बाबतीत झालेले मोठे बदल :

१. प्रश्नांच्या पर्यायाबाबतीत बदल:-

यामुळे सखोल ज्ञान असेल तरच प्रश्न सोडविला जाऊ शकतो.

उदा.

Q. Consider the following plants : (UPSC 2024)

1. Groundnut 2. Horse-gram 3. Soybean

How many of the above belong to the pea family?

(a) Only one (b) Only two (c) All three (d) None

परंपरागत प्रश्नातील पर्यायांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे –

उदा.

Q.Consider the following : (UPSC 2024)

1. ETF 2. Motor Vehicles 3. Currency Swap

Which of the above is/are considered financial instruments?

(a) 1 only (b) 2 & 3 only (c) 1, 2 and 3 (d) 1 &3 only

अशा प्रश्नातElimination technique वापरता येते, जी वरील प्रश्नातीलपर्यायांमध्ये वापरणे शक्य नाही.

२. Statement Based Qs :-

उदा.

Q. Consider the following statements : (UPSC 2024)

Statement I – Giant stars live much longer than dwarf stars.

Statement II – Compared to dwarf stars, giant stars have a greater rate of nuclear reactions.

Which one of the following is correct in respect of the above statements?

(a) Both Statement I &Statement II are correct & stat. II explains stat. I.

(b) Both stat. I & stat. II are correct; but stat. II does not explain stat. I.

(c) Stat. I is correct, but stat. II is incorrect.

(d) Stat. I is incorrect, but stat. II is correct.

अशा प्रश्नांचे प्रमाण ॅर पेपरमध्ये वाढलेले दिसून येते.

सन २०२४ पूर्वपरीक्षा ॅर पेपरमधील निरीक्षणे झ्र

१. २०२३ च्या तुलनेत हा पेपर सोपा होता.

२. यात मूलभूत संकल्पनांवर विशेष भर दिलेला आढळून आला.

३. पर्यावरणातील प्राणी प्रजाती (रस्र्रीूी२) वर अधिक प्रश्न विचारलेगेले.

४. संरक्षण (ट्र्र’३ं१८ / ऊीऋील्लूी) यावर अधिकचे प्रश्न विचारण्यात आले.

५. चर्चेतील स्थळे,टंस्र यावरदेखील अधिक भर होता.

६. योजना व कायदे यावर तथात्मक (ऋूं३) प्रश्न विचारले गेले.

७. आधुनिक भारताच्या इतिहासावर कमी प्रश्न होते.

८. कला व संस्कृती घटकावरील प्रश्न हे चालू घडामोडींवर आधारित होते.

सन २०२४ चा GS पेपर आपल्याला हे सांगतो की, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पना समजून घ्यायला हव्यात. त्या संकल्पनांशी संबंधित तथ्ये (Facts) पाठ असायला हवीत. उदा. राज्यघटनेतील भाग, महत्त्वाची कलमे, घटनादुरुस्त्या माहीत असाव्यात.सन २०२४ मध्ये भागIXA, VIII, कलम २१, कलम १०९ इ. वर प्रश्न विचारले आहेत.

सन २०२५ पूर्वपरीक्षा GS साठी स्ट्रॅटेजी :-

पाया मजबूत करणे : अभ्यासक्रमानुसार NCERT व Ref. Books यातील संकल्पना व तथ्ये समजून घ्या. कमीत कमी पुस्तके अधिकाधिक वेळा वाचा.

PYQs चे विश्लेषण : गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून प्रश्नांची काठिण्य पातळी समजून घ्या. आगामी काळात विचारल्या जाणारया अपेक्षित प्रश्नांवर काम करा.

प्रश्नपत्रिका सोडवून विश्लेषण करा(TestSeries) :प्रश्नपत्रिका सोडवून आपले strong व weak areas समजून weakमुद्यांवर काम करणे.पेपर सोडविताना elimination साठी ‘very’, ‘too’, ‘only’, ‘except’, ‘no’, ‘Every’, ‘All’ etc.शब्दांकडे बारकाईने लक्ष द्या.

चालू घडामोडी वCBB : चालू घडामोडींचा GSवरील प्रभाव बघता नियमितपणे त्यांचा अभ्यास करणे तसेच चालू घडामोडीतील नियमित अभ्यासक्रमातील घटकांवर काम करणे. उदा. Ethics Committee (UPSC २०२४) अशा घटकांच्याबाबतीत परंपरागत स्त्रत्तोतांबरोबर अधिकची माहिती घ्यायला हवी.

स्वतच्या नोट्स बनविणे : स्वतच्या नोट्स असतील तर अधिक फायदा होतो. नोट्स बनवितानाflowchart, tables, diagrams चा वापर करा, जेणेकरून लवकर revision करता येते.

अपेक्षित व महत्त्वाच्या घटकांचे Revision वारंवार व्हायलाच हवे. त्यासाठी स्वतची नोंदवही बनवा. अभ्यासाच्या दबावात बहुतेकदा महत्त्वाचे घटक अभ्यासायचे राहून जातात.

अभ्यासाचे नियोजन : अभ्यासाचे Weekly व Monthly नियोजन बनवा. त्याचे पालन होते की नाही याचे विश्लेषण करा.

अभ्यासातील सातत्य :सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहेत. सातत्यपूर्ण अभ्यास हा आपल्याला स्पर्धेत टिकवून ठेवतो. त्याद्वारे आपल्यात सकारात्मक बदलही घडून येतात.

वेळ व ताणतणावाचे नियोजन : वरील बाबींची अंमलबजावणी झाल्यास वेळेचे नियोजन योग्य प्रकारे होईल. तसेच ‘stressmanagement’ करिता स्वत: योग व ध्यानधारणा करू शकता.आपल्याविषयी सकारात्मक असलेल्या व्यक्तींशी बोलू शकता.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा