Career Guidance

Career Guidance

वाटा करिअरच्या २०२२: चित्रकला देईल आयुष्याला आकार

PUBLISH DATE 18th June 2022

तुम्हाला चित्रकलेची आवड असेल आणि जिद्द असेल, तर तुम्ही कला क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करू शकता.

कोणत्या संधी या क्षेत्रात आहे, त्यासाठी काय करायचे, याविषयी या जाणून घेऊयात... कला शिकवून येत नाही. ती मुळातच काही मुलांमध्ये असते. शालेय जीवनामध्ये त्यांना कशामध्ये आवड आहे हे लक्षात येते. अनेक मुलांना कलेमध्ये आवड असते. काही कारणामुळे ते आपले क्षेत्र बदलतात. त्या क्षेत्रामध्ये त्यांना यशही मिळते, ते नामवंतही होतात. मात्र त्यांच्या मनात खंत राहतेच. आपली आवड कशात आहे, हे मुलांनी ओळखल्यास करिअर निवडण्यासाठी सोपे जाईल. त्यांची आवड आणि व्यवसाय एकच असल्यामुळे ते लोक आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतात. तसेच चांगले यशही मिळवू शकतात. यशस्वी लोकांचा जीवन आलेख बघितल्यास क्रीडा क्षेत्रात सचिन तेंडुलकरांची पॅशन व आवड एकच होती. त्यांना त्यातच करिअर करायचे होते. त्यामुळे ते यशाच्या मोठ्या शिखरापर्यंत जाऊ शकले. असेच आणखी एक उदाहरण म्हणजे तबलावादक झाकिर हुसेन.

आर्ट कोर्स

कला क्षेत्रामध्ये पदवी घ्यायची असेल, तर बारावी हा पाया मानला जातो. बारावी पास झाल्याशिवाय आर्ट कोर्ससाठी तिथे अॅडमिशन मिळत नाही आणि शालेय जीवनातून कला क्षेत्रात जाण्यासाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षा उत्तीर्ण असणे अत्यावश्यक आहे. इंटरमिजिएट परीक्षा ही यासाठी आवश्यक आहे. कारण त्यामध्ये कला क्षेत्राचा प्राथमिक पाया घातला जातो. नेचर, स्टील लाइफ, डिझाईन इत्यादी विषय आहेत. या विषयांची ओळख होते. त्यामुळे मुलांना आपले विषय निवडणे सोपे जाते. म्हणून इंटरमिजिएट परीक्षा पास असणे आवश्यक आहे. दहावीनंतरही अनेक डिप्लोमा तर बारावीनंतर पदवी कोर्स आहेत. करिअरसाठी पदवी कोर्सचा जास्त उपयोग होतो.

पदवीचाही पर्याय

बारावी झाल्यानंतर अनेक कोर्सेस आहेत. यात बॅचलर ऑफ फाइन आर्ट तसेच त्यात पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. यामध्ये बीएफए पेंटिंग आणि शिल्पकला, अप्लाईड आर्ट असे विषय आपण निवडू शकतो. अप्लाईड आर्ट म्हणजे जाहिरातीसंबंधी कोर्स आहे. आपल्याला वर्तमानपत्र किंवा मासिक यांच्यासाठी ज्या जाहिराती लागतात. त्यात स्टेशनरीचे डिझाईन्स, कंपनीचे लोगो, सिम्बॉल यां पासून सुरुवात होते. त्याची व्याप्ती वाढली आहे. आता त्यामध्येच मर्कंडाझिंग हा एक विषय आहे. यात शोरूमचे फ्रंट शोकेस सजवायचे काम असते. इव्हेंटनुसार किंवा सणवारानुसार वेगवेगळ्या पद्धतीने शोकेस सजविण्याचे काम यात येते. अप्लाईड आर्टमधील हा वेगळा विषय समोर येत आहे. याला डिमांडही खूप आहे. प्रत्येक दुकानदाराला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपले दुकान सजवावेच लागते. तसेच अप्लाईड आर्टमध्ये इलस्ट्रेशन, टाइपोग्राफी यासारखे आणखी बरेच विषय समाविष्ट झाले आहेत. यात अॅडव्हर्टायझिंग फिल्म म्हणजे एखादी जाहिरात फिल्मच्या माध्यमातून दाखवणे याचाही समावेश आहे. हे फिल्ड खूप मोठे आहे. विद्यार्थ्यांनी या सर्वांचा अभ्यास करून त्यांची कशामध्ये रुची आहे हे ठरवावे.

नवे कोर्स

सध्याच्या काळात नवीन कोर्स खूप निघाले आहेत. उदाहरणार्थ म्हणजे फॅशन डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन, शू डिझाईन, इंटिरियर डेकोरेशन, टेक्स्टाईल डिझाईन, आर्ट डायरेक्शन, सिरॅमिक अँड पॉटरी यामध्ये बॅचलर फाईन आर्ट कोर्स करता येतो. इतक्या प्रकारचे कोर्सेस आहेत. तुम्हाला हवे ते तुम्ही निवडू शकता. विद्यार्थ्यांनी या सर्व विषयांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अंतर्मनातून त्यांना काय वाटते, कुठल्या फिल्डमध्ये गेल्यानंतर आपल्याला जमेल किंवा आपण त्यामध्ये यश मिळवू शकतो, याचा विचार करावा. तो आपल्या आवडीचा विषय आहे की नाही हेही आवर्जून पाहावे. या सर्व कोर्सेसचा अभ्यास करून मगच त्यांनी ठरवावे. त्यांना बारावीनंतर काय करायचे आहे. बारावीच्या पुढच्या करिअरचा अभ्यास करावा आणि मगच त्यांनी निर्णय घ्यावा की त्यांना काय करायचे आहे.

लेखक - पूनम राणा, चित्रकार

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


वाटा करिअरच्या २०२२: चित्रकला देईल आयुष्याला आकार
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

वाटा करिअरच्या २०२२: चित्रकला देईल आयुष्याला आकार
6th February 2024

Career In Fashion Designing

वाटा करिअरच्या २०२२: चित्रकला देईल आयुष्याला आकार
1st January 2024

AI Trends 2024

वाटा करिअरच्या २०२२: चित्रकला देईल आयुष्याला आकार
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

वाटा करिअरच्या २०२२: चित्रकला देईल आयुष्याला आकार
25th December 2023

Skill Development Courses 2024

वाटा करिअरच्या २०२२: चित्रकला देईल आयुष्याला आकार
25th December 2023

UPSC Free Coaching

वाटा करिअरच्या २०२२: चित्रकला देईल आयुष्याला आकार
23rd December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: चित्रकला देईल आयुष्याला आकार
14th December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: चित्रकला देईल आयुष्याला आकार
8th December 2023

Career Options for Arts Stream

वाटा करिअरच्या २०२२: चित्रकला देईल आयुष्याला आकार
28th November 2023

Career In Railways