CET-CELL मार्फत जवळपास सर्व कोर्सेसची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे, या यादी नुसार उमेदवाराने आपली संपुर्ण माहिती जसेकी नाव, लिंग, प्रवर्ग, गुण इत्यादी तपासावी व त्रुटी असल्यास विहीत कालावधीत नमूद पध्दतीने सदर त्रुटींची पुर्तता केली आहे, आता सर्वात महत्वाचे काम म्हणजे ऑपशन फॉर्म भरणे. याकरिता सर्व साधारण सूचना पुढील प्रमाणे ...
उमेदवाराने फायनल मेरीट क्रमांक तपासावा. उमेदवाराने केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप १ पहिल्या फेरीकरीता उपलब्ध असलेल्या प्रवर्गनिहाय जागा संकेतस्थळावर प्रसिध्द झाल्यानंतर माहिती करुन घ्याव्यात.
३. विकल्प अर्ज भरणे: उमेदवाराने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पहिल्या फेरीसाठी स्वतःच्या लॉगिन मधून पाठयक्रम व संस्था यांच्या पसंती क्रम असणारा ऑनलाईन विकल्प नमुना भरणे व त्यास निश्चित करणे. एकदा उमेदवाराने संबंधित प्रवेश फेयांसाठी त्याच्या/तिच्या लॉगिनद्वारे ऑनलाईन विकल्प अर्जाची निश्चिती केली की उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत सादर केलेला पर्याय / प्राधान्य बदल करण्याची / रद्द करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
4. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पहिल्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची उमेदवाराने त्याच्या/तिच्या लॉगीनद्वारे स्विकृती करणे.
क) उमेदवाराला पहिल्या कॅप फेरीमध्ये दिलेली जागा वाटप नियमांनुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वतः करावी. उमेदवारानी स्वतः च्या लॉगीनमधून पात्रता गुण, प्रवर्ग, लिंग, आरक्षण स्वतः चे विशिष्ट आरक्षण इ. संबंधीचे उमेदवारांनी केलेले दावे बरोबर आहेत याची खात्री करुन घ्यावी. तसेच त्याने/तीने दाखल केलेले दाव्यांच्या अनुषंगाने संबंधित कागदपत्रे अपलोड केलेले आहेत याची खात्री करावी.
ग) ज्या उमेदवारास पहिल्या कॅप फेरीमध्ये त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंतीक्रमांकाच्या जागेचे ऑटोफ्रीजड (freezed) वाटप झाले असेल. अशा उमेदवारांनी वाटप झालेली जागा स्वीकारणे आवश्यक आहे व असे उमेदवार जागा-स्विकृती शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणा करतील. असे उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पुढील फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील.
घ) ज्या उमेदवारास पहिल्या कॅप फेरीमध्ये त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकाखेरीज इतर पसंतीक्रमांकाच्या जागेचे वाटप झालेले आहे व ती जागा त्याच्या लॉगीनमधून स्वतः फ्रीइड केली आहे. अशा उमेदवारांनी वाटप केलेली जागा स्वीकारणे आवश्यक आहे व असे उमेदवार जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणा करतील. असे उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पुढील फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील. (उमेदवाराने हा पर्याय काळजापुर्वक वापरला पाहिजे)
ड) ज्या उमेदवारांना त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंतीक्रमाकाखेरीज इतर पसंतीक्रमांकाच्या जागेचे वाटप झाले आहे व जे उमेदवार पुढील फेरीमध्ये वरच्या पसंतीक्रमाची जागा मिळण्याकरीता सहभागी होण्यास इच्छुक असतील अशा उमेदवारांनी पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या जागेचा "बेटरमेंन्ट" पर्याय निवडून स्वीकार करणे आवश्यक आहे व असे उमेदवार जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणा करतील.
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पहिल्या फेरीनंतर जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे आणि •आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करणे.
टिप.
क) उपरोक्त ०४ (ग) व ०४ (घ) नुसार जागा स्विकारलेल्या उमेदवारांनी प्रवेशाच्या निश्चितीकरणासाठी जागावाटप केलेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे अनिर्वाय आहे.
ख) संस्था आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करेल व उमेदवारांचा प्रवेश ऑनलाईन प्रणालीत संस्थेच्या लॉगीन मधून ताबडतोब अपलोड करेल व उमेदवारांचा प्रवेश ऑनलाईन पृष्ठीसाठी ऑनलाईन प्रणालितून मिळणारी पावती व शुल्क भरल्याची पावती देईल. जर संस्थेला उमेदवाराच्या अर्जाच्या नमूण्यात केलेल्या दाव्याच्या आधारे केलेले जागावाटप व त्याने केलेला दावा योग्य नाही असे आढळल्यास संस्थेने अशा उमेदवाराचा प्रवेश निश्चित करु नये आणि अशा उमेदवाराने त्याच्या लॉगीनमधून ई-पडताळणी पध्दत किंवा प्रत्यक्ष ई-पडताळणी पध्दत यांद्वारे तक्रार/हरकत नोंदवावी.
--------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.