Schools

Schools

दहावी व बारावीसाठी महाराष्ट्र शासनाच्या तीन शैक्षणिक वाहिन्या

PUBLISH DATE 6th July 2020

महाराष्ट्र शासनाने दहावी, बारावीसाठी शासनाच्या तीन शैक्षणिक वाहिन्या जिओ टीव्हीवर सुरू केल्या आहेत

करोना महामारीमुळे शाळा बंद आहेत; मात्र ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. हे शिक्षण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून रविवारी ५ जुलै रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तीन शैक्षणिक वाहिन्यांचे उद्घाटन केले.

दहावीचे मराठी आणि इंग्रजी माध्यम आणि बारावीच्या विज्ञान शाखेसाठी जिओ टीव्हीवरील ज्ञानगंगा या तीन शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय 'जिओ सावन'वर महावाणी रेडीओ कार्यक्रमाचे उद्घाटनही गायकवाड यांनी केले.

वर्षा गायकवाड यांनी रविवारी ५ जुलै रोजी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी लिहिले आहे की, 'आज इ.१० वी मराठी व इंग्रजी माध्यम, इ.१२ वी विज्ञान शाखेसाठी जिओ टी.व्ही.वरील ज्ञानगंगा या ३ शैक्षणिक चॅनेलचे उद्घाटन केले. इतर ९ स्वतंत्र चॅनेल लवकरच येणार. जिओ सावन वर महावाणी रेडीओ कार्यक्रमाचे देखील उद्घाटन केले.'

असे होईल प्रक्षेपण

  1. जिओ प्लॅटफॉर्मवरील तीन वाहिन्यांवर दररोज सहा तास तासिका प्रक्षेपित केल्या जातील
  2. इतर अठरा तास त्याचे पुन:प्रक्षेपण होईल
  3. तासिकांचे वेळापत्रक लवकरच उपलब्ध होईल
  4. लवकरच इतर नऊ जिओ वाहिन्या सुरू करणार
  5. इयत्ता दहावी (उर्दू माध्यम), इयत्ता नववी (मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यम), इयत्ता आठवी, सातवी आणि सहा
  6. वी (इंग्रजी, मराठी, उर्दू माध्यम) आणि इयत्ता तिसरी-चौथी (इंग्रजी, उर्दू, मराठी) वाहिनी लवकरच सुरू होणार.


इयत्तानिहाय चोवीस तास वाहिनी सुरू राहणार आहे. सध्या राज्यातील जवळपास कोट्यावधी नागरिकांकडे जिओ फोन, जिओ मोबाइल आहे, त्यात ते जिओ टीव्हीद्वारे या तासिकातून अभ्यास करू शकणार आहे. याबरोबरच 'जिओ सावन'वर विद्यार्थ्यांना बोलकी पुस्तके उपलब्ध करुन दिली जाणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


दहावी व बारावीसाठी महाराष्ट्र शासनाच्या तीन शैक्षणिक वाहिन्या
30th January 2024

MPSOS Result 2023

दहावी व बारावीसाठी महाराष्ट्र शासनाच्या तीन शैक्षणिक वाहिन्या
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

दहावी व बारावीसाठी महाराष्ट्र शासनाच्या तीन शैक्षणिक वाहिन्या
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

दहावी व बारावीसाठी महाराष्ट्र शासनाच्या तीन शैक्षणिक वाहिन्या
27th December 2023

NIOS Result 2023 Out

दहावी व बारावीसाठी महाराष्ट्र शासनाच्या तीन शैक्षणिक वाहिन्या
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

दहावी व बारावीसाठी महाराष्ट्र शासनाच्या तीन शैक्षणिक वाहिन्या
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

दहावी व बारावीसाठी महाराष्ट्र शासनाच्या तीन शैक्षणिक वाहिन्या
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

दहावी व बारावीसाठी महाराष्ट्र शासनाच्या तीन शैक्षणिक वाहिन्या
22nd June 2023

JNVST Result 2023