Medical Admissions 2024-25

Medical Admissions 2024-25

नीट समुपदेशन २०२०: प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ

PUBLISH DATE 10th November 2020

मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) ने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे प्रवेश निश्चित करण्याची मुदत वाढवली आहे.

आधी विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश निश्चिती करायची होती. आता १४ नोव्हेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे.

विद्यार्थी एमसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यासंदर्भातील माहिती वाचू शकतील. सूचना डाऊनलोडदेखील करता येईल. एमसीसीने शनिवारी यासंदर्भातील सूचना जारी करत कॉलेजांमध्ये रिपोर्ट करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी करण्यास १८ नोव्हेंबर २०२० पासून सुरूवात होणार आहे. १८ ते २२ नोव्हेंबरपर्यंत दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी होईल. शुल्क, पसंतीक्रम भरण्यासाठी १९ ते २२ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. जागा अलॉट होण्याची प्रक्रिया २३ ते २४ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील. दुसऱ्या फेरीची यादी २५ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. विद्यार्थी त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत रिपोर्ट करू शकतील.

प्रवेश निश्चितीच्या वेळी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे -

१) एनटीएने दिलेले परीक्षेचे अॅडमिट कार्ड
२) एनटीएने जारी केलेली निकालाची प्रत
३) जन्मतारखेचा दाखला
४) बारावीचे प्रमाणपत्र
५) बारावीची गुणपत्रिका
६) ८ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (जे छायाचित्र अर्जावर लावले असेल तेच हवे)
७) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर
८) ओळखपत्र
या व्यतिरिक्त एनआरआय आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थांनी त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा