ऑनलाइन शिक्षण ही काळाची गरज आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत अध्ययनाची प्रक्रिया सुरु ठेवण्यासाठी शिक्षक ऑनलाइन पर्यायांचा जास्तीत जास्त वापर करुण्याचा प्रयत्न करत आहेत.
अनेक अडथळे पार करत नवं तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत. या प्रक्रियेत शिक्षकांनी कोणते मुद्दे लक्षात ठेवावेत याविषयी जगदीश इंदलकर यांनी मार्गदर्शन केलं आहे.
आजची पिढी घडवू इच्छिणारा प्रत्येकजण अथकपणे काम करतो आहे. शाळा बंद आहेत, पण शिक्षण सुरू आहे. ध्येयमंत्र जपत ऑनलाइन शिक्षणाचे विविध मार्ग अनुसरले जात आहेत. हे करत असताना गुगल क्लासरूम, झूम आणि व्हॉट्सअॅप या पर्यायांच्या माध्यमातून मुलांना अभ्यासात खिळवून ठेवताना दीक्षा, ई-बालभारती, खान अकादमी इ. अॅप्स आणि तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेले अगणित शैक्षणिक अॅप्स देवदूतसारखे मदतीला आले आहेत. त्यात अगदी लहान मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काही उपयुक्त शैक्षणिक मराठी-इंग्रजी शब्दकोश, मराठी- इंग्रजी व्याकरण शिकण्यासाठी/ समजून घेण्यासाठी, पाढे, गणितं, प्रश्नपेढ्या, विज्ञान, कोडी, सामान्यज्ञान आणि इंग्रजी संभाषणासाठी उपयुक्त असे हे अॅप्स आहेत.
अॅप्स, ब्लॉग्स, ई-लर्निंग यासारखे पर्याय वापरत शाळांमधील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार आणि रंजक शिक्षण देण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. शाळेत मुलांच्या चाचण्या घेता याव्यात म्हणून ई-प्रश्नपेढी कशी वापरावी, ब्लॉग्सचा वापर कसा करावा, विविध विषयांचं मूल्यमापन कसं करावं, ई-बुक्स, नवीन अभ्यासक्रम, विविध अॅप्स अशा अनेक गोष्टी आज उपलब्ध करून दिल्या आहेत. या सगळ्या गोष्टी शिक्षक वापरत आहेत आणि त्याचा त्यांना फायदाही होतो आहे. अनेक शिक्षक आपापल्या कल्पनांनुसार विविध अॅप्स किंवा इतर गोष्टींची निर्मिती आणि त्यांचा प्रत्यक्ष अध्ययनात उपयोग करत आहेत. सुविधांनुसार प्रत्येक ठिकाणच्या ई-लर्निंगच्या वापराचं प्रमाण कमी-अधिक असेल, पण प्रयोगांचं वारं निश्चितपणे वाहू लागलं आहे. खरं तर अध्ययन-अध्यापन शास्त्र, बालमानसशास्त्र आणि तंत्रज्ञानाचा एकत्रित मिलाफ म्हणजे अॅप आहे, असं म्हणता येईल. शिक्षकांनी मुलांना उपयोगी पडणारे व्हिडीओ, पीपीटी, ऑनलाइन टेस्ट असं ई-साहित्य तयार केले आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यातील दुवा आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासामध्ये ही अॅप्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अॅपमुळे होणाऱ्या फायद्यांमध्ये मुलांना स्व-अध्ययन करणं सोपं होतं. आता मुलं स्वाध्याय स्वत: स्मार्ट फोनवर सोडवू शकतात. तसंच पालकांना आपल्या मुलांच्या प्रगतीची माहिती या अॅपमुळे मिळण्यास मदत होते.
० अॅपमध्ये काय असतं?
० अॅप्सच्या माध्यमातून ऑनलाइन टीचिंगचा प्रभावी वापर करताना मॉनिटरिंग म्हणजेच सुनियंत्रण आवश्यक आहे, कारण...
० ऑनलाइन शिक्षण हे रिमोट लर्निंग असल्यानं...
हे लक्षात ठेवा...
० गुगल फॉर्म- एक प्रभावी माध्यम
या सर्वांचा आधार घेऊन ऑनलाइन शिक्षणाचं नियोजन आणि व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे.
(लेखक घाटकोपर येथील के. व्ही. के. घाटकोपर सार्वजनिक स्कूल आणि कनिष्ठ कॉलेज येथील प्राचार्य आहेत.)
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा
ESIC set to establish 10 new medical schools across India
सीबीएसईच्या अभ्यासक्रमात तिसरी, सहावी वगळता कोणताही बदल नाही
असे घडले शास्त्रज्ञ
MP School Summer Vacation Date 2024
UGC guidelines released for reopening of universities and colleges
NIOS Board exam 2020 dates announced