Career Guidance

Career Guidance

वाटा करिअरच्या २०२२: महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उपलब्ध कोर्सेस

PUBLISH DATE 6th July 2022

राहुरी (जि. नगर) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (एमपीकेव्ही) स्थापना १९६८ मध्ये झाली. हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय कृषी विद्यापीठ आहे. शेतकऱ्यांना शिक्षण, संशोधन व विस्तारित शिक्षणाच्या माध्यमातून सेवा या विद्यापीठामार्फत पुरविल्या जातात. या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र नगर, पुणे, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या १० जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल हे या विद्यापीठाचे कुलपती असतात तर महाराष्ट्र सरकार मधील कृषी मंत्री हे प्रो-कुलगुरू असतात.

या विद्यापीठाला शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणातील उत्तम कार्याबद्दल आयसीएआर, दिल्लीतर्फे २००२मध्ये ‘सरदार पटेल आउटस्टँडिंग इन्स्टिट्यूट अवॉर्ड’ मिळाला आहे. तर भारत सरकारकडून ‘इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलेन्स’ अशी मान्यता आणि १०० कोटींचा निधी २००७-०८च्या बजेटमध्ये विद्यापीठाला मिळाला आहे.

विद्यापीठातील उपलब्ध महत्त्वाचे कोर्सेस

1) बी. एस्सी. (B.Sc. Hons.)

  • कालावधी - ४ वर्षे

  • पात्रता - बारावी (biology compulsory)

  • प्रवेश परीक्षा - नाही.

मेरिट बेसिसवर प्रवेश मिळतो.

हा कोर्स

१. ॲग्रिकल्चर

२. ॲनिमल हजबंडरी

३. हॉर्टिकल्चर

४. ॲग्री बिझनेस अँड मॅनेजमेंट

या ४ विषयांसाठी उपलब्ध आहे.

2) बी .टेक. (B. Tech)

  • कालावधी - ४ वर्षे

  • पात्रता - बारावी (PCB/PCMB)

  • प्रवेश परीक्षा - नाही.

मेरिट बेसिसवर प्रवेश मिळतो.

हा कोर्स

१. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग

२. फूड टेक्नॉलॉजी

३. बायोटेक्नॉलॉजी

या ३ विषयांसाठी उपलब्ध आहे.

3) डिप्लोमा इन ऑरगॅनिक ॲग्रिकल्चर

  • कालावधी - १ वर्ष

  • पात्रता - बारावी (PCB/PCMB)

  • प्रवेश परीक्षा - नाही.

मेरिट बेसिसवर प्रवेश मिळतो.

4) एम. एस्सी. (M.Sc)

  • कालावधी - २ वर्षे

  • पात्रता - त्या विषयातील पदवी

  • प्रवेश परीक्षा - MCAER PG CET

हा कोर्स

१. ॲग्रिकल्चर

२. हॉर्टिकल्चर

३. ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी

या ३ विषयांसाठी उपलब्ध आहे.

5) एम. टेक. (M.Tech)

  • कालावधी - २ वर्षे

  • पात्रता - B.E./B.Tech.

  • प्रवेश परीक्षा - MCAER PG CET

हा कोर्स

१. इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंग

२. प्रोसेस अँड फूड इंजिनिअरिंग

३. सॉईल अँड वॉटर काँझर्वेशन इंजिनिअरिंग

४. फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग

या ४ विषयांसाठी उपलब्ध आहे.

6) बी.बी.ए. (BBA)

  • कालावधी - ४ वर्षे

  • पात्रता - बारावी

  • प्रवेश परीक्षा - नाही

हा कोर्स ॲग्रिकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट या विषयात उपलब्ध आहे.

7) एम.बी.ए. (MBA)

  • कालावधी - ३ वर्षे

  • पात्रता - त्या विषयांतील पदवी

  • प्रवेश परीक्षा - CAT/MAT/XAT

हा कोर्स ॲग्रिकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट या विषयात उपलब्ध आहे.

8) पीएच. डी. (Ph.D)

  • कालावधी - ३ वर्षे

  • पात्रता - M.Sc/M.Tech

  • प्रवेश परीक्षा - CSIR NET

हा कोर्स

१. ॲग्रिकल्चर

२. ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग

या २ विषयात उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

संकेतस्थळ - https://www.mpkv.ac.in

लेखक - सविता भोळे

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


वाटा करिअरच्या २०२२: महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उपलब्ध कोर्सेस
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

वाटा करिअरच्या २०२२: महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उपलब्ध कोर्सेस
6th February 2024

Career In Fashion Designing

वाटा करिअरच्या २०२२: महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उपलब्ध कोर्सेस
1st January 2024

AI Trends 2024

वाटा करिअरच्या २०२२: महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उपलब्ध कोर्सेस
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

वाटा करिअरच्या २०२२: महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उपलब्ध कोर्सेस
25th December 2023

Skill Development Courses 2024

वाटा करिअरच्या २०२२: महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उपलब्ध कोर्सेस
25th December 2023

UPSC Free Coaching

वाटा करिअरच्या २०२२: महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उपलब्ध कोर्सेस
23rd December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उपलब्ध कोर्सेस
14th December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उपलब्ध कोर्सेस
8th December 2023

Career Options for Arts Stream

वाटा करिअरच्या २०२२: महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उपलब्ध कोर्सेस
28th November 2023

Career In Railways