Engineering

Engineering

‘सीईटी २०२०’ प्रवेशाची गुणपद्धती जाहीर

PUBLISH DATE 20th December 2019

राज्य सामाइक परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेची गुणपद्धती जाहीर केली असून, अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित परीक्षा होणार आहे. यंदाही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. गणिताचा पेपर १०० गुणांचा असणार आहे; तर अन्य दोन विषय हे ५० गुणांचे असणार आहे, अशी माहिती वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे.

राज्यात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी विद्याशाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी सीईटी घेतली जाते. गणिताचा पेपर १०० गुणांचा राहणार आहे. यामध्ये अकरावीच्या अभ्यासक्रम आधारित १० गुणांचे प्रश्‍न असणार आहेत. प्रत्येक प्रश्‍नाला २ गुण असणार आहे. प्रश्‍नपत्रिका सोडवण्यासाठी ९० मिनिटांचा कालावधी असणार आहे. त्याच बरोबर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे ५० गुणांचे असणार आहेत. यातही अकरावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १० गुणांचे प्रश्‍न आणि बारावीच्या अभ्यासक्रमावरील ४० गुणांचे प्रश्‍न असतील, या विषयांना प्रत्येक प्रश्‍नांसाठी १ गुण आहे. जीवशास्त्र आणि जीवशास्त्र (प्राणीशास्त्र) यासाठी ५० गुणांचा पेपर असेल यासाठीही १०:४० असाच पॅटर्न राहणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. अधिक माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे.

पर्सेंटाइलसाठी संबंधित गटातील गुण

'पीसीबी' आणि 'पीसीएम' या दोन्ही गटांमधून विद्यार्थी परीक्षा देणार असतील, तर त्यांचे पर्सेन्टाइल गुण काढताना त्याच गटातील भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र या दोन विषयांचे गुण त्या त्या गटात ग्राह्य धरले जाणार आहेत. गटांतील विषयांची विभागणी होणार नसल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

 

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs 2020 |

 

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------