ITI Scope and salary: औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) हे विद्याथ्यर्थ्यांसाठी एक महत्त्वाचे व्यावसायिक शिक्षणाचे केंद्र बनले आहे. विशेषतः अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आयटीआय हा सर्वोत्तम पर्याय ठरत असल्याचे सिद्ध होत आहे. येथे दिले जाणारे प्रशिक्षण एक किंवा दोन वर्ष कालावधीचे असते. यात अनेक तांत्रिक व उद्योग क्षेत्राशी संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.
ITI courses in Maharashtra: 'आयटीआय'चे अभियांत्रिकी ट्रेड्स हे विशेषतः हाताने काम करणाऱ्या, यंत्रावर काम करणाऱ्या, विद्युत व यांत्रिक उपकरणांवर काम करणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय योग्य आहे. फिटर, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वायरमन, ड्राफ्ट्समन आणि प्लंबर यांसारख्या अनेक ट्रेड्समध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाते. हे सर्व अभ्यासक्रम प्रात्यक्षिकावर आधारित असल्यामुळे विद्याथ्यांमध्ये प्रत्यक्ष उद्योगातील कामासाठी आवश्यक असलेली कौशल्ये विकसित होतात.
What after ITI Course? आयटीआय शिक्षण घेतल्यानंतर काय करावे?
'आयटीआय'चे दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्याथ्यांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमामध्ये (डिप्लोमा) थेट दुसऱ्या वर्षी प्रवेश मिळतो. उदा. इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन कोर्स पूर्ण केलेल्या विद्याथ्यांना इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदविकेमध्ये दुसऱ्या वर्षी थेट प्रवेश मिळू शकतो. अशाच प्रकारे फिटर, टर्नर, मशिनिस्ट यांना मेकॅनिकल इंजिनीयरिंगमध्ये, तर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी इलेक्ट्रॉनिक्स पदविका शाखा उपलब्ध होते.
Career after ITI Course: 'आयटीआय'मधील ट्रेड पूर्ण केल्यानंतर उमेदवार अनेक मागांनी आपले करिअर घडवू शकतात. कोणी पदविका करून पुढे इंजिनीअरिंगची पदवी (BE/B.Tech) करू शकतो, तर काहीजण नोकरीकडे वळतात. खासगी क्षेत्रात टेक्निशियन, मशिन ऑपरेटर, लाइनमन किंवा सव्र्व्हिस इंजिनीअर अशा विविध पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. शिवाय रेल्वे, महावितरण, एमएसईबी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य सरकारी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर भरती केली जाते. यासाठी संबंधित भरती परीक्षा आणि शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिसशिप) उपलब्ध असतात.
Government Jobs after ITI: 'आयटीआय'चे ट्रेड ग्रामीण आणि शहरी भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात. कमी खर्चात तांत्रिक शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. वेल्डर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर व्यवसायांमध्ये स्वावलंबी होण्याच्या मोठ्या संधी आहेत. काही विद्यार्थी स्वतःची वर्कशॉप, सर्व्हिस सेंटर किंवा बांधकाम संबंधित कामे सुरू करतात. 'स्किल ट्रेनिंग सेक्टर'मधील हे तांत्रिक शिक्षण हे केवळ कौशल्य विकसित करणारे नसून, स्वावलंबनाकडे नेणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे तरुणांनी 'आयटीआय'चा पर्याय केवळ 'शेवटचा पर्याय' म्हणून न पाहता, एक सक्षम आणि व्यावसायिक वाटचाल म्हणून पाहण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील अनेक यशस्वी व्यावसायिकांची सुरुवात 'आयटीआय' मधूनच झालेली आहे आणि विशेषतः त्यांनी अभियांत्रिकी ट्रेड निवडल्याचे दिसून येते, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |
We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Government Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send a WhatsApp message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.
Post Graduate Teacher
सांख्यिकीमधील करिअर संधी
IBPS RRB CRP XIII 2024 Pre-Exam
BARC Mumbai Recruitment 2024
IIT Tirupati invites applications for summer internships
Kamala Nehru College Delhi recruitment 2021: Last date to apply online
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी मध्ये अधिकारी पदाच्या जागांसाठी भरती प्रक्रिया २०२१