Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: शाळा आणि समुपदेशक व मार्गदर्शक यांची भूमिका

PUBLISH DATE 10th June 2022

पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही, जास्त सजग, जबाबदार, जागृत पालक आणि विद्यार्थी चोखंदळपणे करिअरविषयी विचार करत आहेत, संवाद साधत आहेत.

परंतु, करिअरविषयी, शाखा निवडीबद्दल निर्णय घेण्यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांची महत्त्वाची अडचण म्हणजे आवश्यक ती माहिती कोठून मिळवायची. कोणते असे विश्वासपूर्वक स्रोत आहेत ज्यांच्याकडून आपल्याला आवश्यक माहिती मिळेल? चौकशी करायची तरी कुणाकडे? पहिला प्रश्न म्हणजे माहिती कुठे मिळेल? मला अगोदर, वेळेतच समजले असते तर मी पण हे करू शकलो असतो. असे विचार आपल्या मनात नेहमी डोकावत असतात. अनेक वेळा हे विचार फक्त डोक्यातच राहतात आणि त्यांना आवश्यक उत्तरं मिळत नाहीत, शंकांचे निरसन होत नाही. समाजातील अशा विविध स्रोतांची माहिती, माहिती मिळवण्यासाठी करून घेऊया.

शाळांची भूमिका

विद्यार्थ्यांना करिअर, शाळेनंतरचे अध्ययन याविषयी योग्य मार्गदर्शन शाळेतूनच मिळणं आवश्यक आहे. प्रत्येक शाळेमधून त्यासाठी समुपदेशक व मार्गदर्शकाची निवड केलेली असते. विविध उपक्रमातून किमान माहिती पुरवणं हे शाळांचे कर्तव्य आहे. एवढेच नव्हे तर ते शाळांकडून मिळवणं हे आपले पालक म्हणूनही काम आहे. आपल्या मुलांचं भवितव्य हा प्रत्येक शाळेचा श्वास असला पाहिजे. शंकासमाधानाचा तास त्यासाठी आखता जरूर येईल.

वर्तमानपत्र आणि मीडियाची भूमिका

अनेक वर्तमानपत्रातून मुलांना, पालकांना अशा प्रकारचे समुपदेशन वर्षभर केले जात असते. त्यातून येणाऱ्या जाहिराती त्यांना अनेक मार्ग सुचवत असतात. उद्योगसमूहाकडून उद्देश प्रेरित अशा प्रदर्शनांच्या माध्यमातूनपण आवश्यक माहिती पोहचवण्याचं काम सुरू असते.

संस्थांना भेटी

आपल्याला आवश्यक ती माहिती आणि आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला बसल्या जागी मिळणं शक्य नाही. त्यासाठी आपल्याला घर सोडून बाहेर पडावेच लागेल. विविध महाविद्यालयं, कोर्सेस चालवणारी कार्यालय, यांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती मिळवणं जास्त उपयुक्त ठरणार आहे. अशी माहिती अद्ययावत आणि प्रथमदर्शनी अशी असणार आहे.

महाजालात शोध

विविध सर्च इंजिनचा वापर करून आपल्याला आवश्यक ती माहिती मिळवणं आता अवघड नाही. आपल्याला अपेक्षित तो शब्द टाइप करा आणि सर्च करा. माहितीचे अनेक पदर तुमच्या समोर उलगडले जातील. त्यातील काय घ्यायचं आणि काय नाही हे ठरवायला हवं. सायबर फसेवेगिरीपासून सावध रहायला हवं.

व्यावसायिक समुपदेशक व मार्गदर्शक

 

समाजात शैक्षणिक समस्यांवर उपाय सुचविणारे, दिशादर्शन करणारे असे अनेक सेवाभावी आणि व्यावसायिक तत्त्वावर काम करणारे उपलब्ध आहेत. शैक्षणिक सल्लागार केंद्रातून आपण माहिती मिळवू शकतो. ज्यांच्या द्वारे प्रत्यक्ष मुलाखतीतून माहिती उपलब्ध होऊ शकते. कल आणि आवड चाचणीची पण सोय असते, शंकांचे पण निरसन होऊ शकते.

शासकीय पोर्टल

करिअर विषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, शिष्यवृत्त्या, महाविद्यालय, प्रवेश परीक्षा याविषयी माहिती. ११२० हुन अधिक शिष्यवृत्ती संधी विषयी माहिती Maha Career Portal मधून मिळते. करिअरमध्ये कशाप्रकारे प्रवेश मिळवू शकता, त्यासाठी शैक्षणिक पात्रता, कॉलेज महाविद्यालयाची माहिती, शिष्यवृत्ती माहिती, भविष्यातील संधी, तुम्ही किती पैसे कमवू शकता. कोर्सेससाठी प्रवेश परीक्षाविषयी, आवश्यक क्षमता, नोकरीच्या संधी अशा विविधांगी परिपूर्ण माहिती आपणास महाकरिअर पोर्टलवर अगदी मोफत मिळेल. विद्यार्थ्यांच्या सरल आयडी वरून तुम्ही या पोर्टल मधून माहिती घेऊ शकता.

मग वाट कसली बघता. दिशा मिळाली आहे वाटचाल करायची आहे!

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी-पालक संवाद २०२२: शाळा आणि समुपदेशक व मार्गदर्शक यांची भूमिका
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: शाळा आणि समुपदेशक व मार्गदर्शक यांची भूमिका
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: शाळा आणि समुपदेशक व मार्गदर्शक यांची भूमिका
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: शाळा आणि समुपदेशक व मार्गदर्शक यांची भूमिका
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: शाळा आणि समुपदेशक व मार्गदर्शक यांची भूमिका
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: शाळा आणि समुपदेशक व मार्गदर्शक यांची भूमिका
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: शाळा आणि समुपदेशक व मार्गदर्शक यांची भूमिका
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: शाळा आणि समुपदेशक व मार्गदर्शक यांची भूमिका
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: शाळा आणि समुपदेशक व मार्गदर्शक यांची भूमिका
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: शाळा आणि समुपदेशक व मार्गदर्शक यांची भूमिका
28th November 2023

Career In Railways