Jobs

Jobs

इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत प्रोग्रामिंग असिस्टंट पदांची भरती २०२२

PUBLISH DATE 1st December 2022

 इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

या माध्यमातून वॉक-इन प्रक्रियेद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने प्रोग्रामिंग असिस्टंटच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

पात्रता

उमेदवारांना बीटेक/एमसीए किंवा बीएससी आयटी/बीसीए/बीएससी कॉम्प्युटर सायन्स किंवा त्या समकक्ष पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराची वयोमर्यादा २३ ते ३० वर्षांदरम्यान असावी.

अशी होईल निवड

कागदपत्रांची पडताळणी, शॉर्ट लिस्टिंग, ऑनलाइन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असलेल्या वॉक-इन-निवड प्रक्रियेतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवाराने अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे मूळ स्वरूपात आणणे आवश्यक आहे. प्रत्येकी तीन (०३) छायाप्रतींचे संच आणि A-४ पेपरमध्ये (मूळ + २ छायाप्रती) रीतसर टाईप केलेले असणे आवश्यक आहे.

पगार

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४७ हजार ०४३ रुपये इतका पगार दिला जाणार आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहेमुलाखत तपशील

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सकाळी १० या वेळेत इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनल सिलेक्शन, आयबीपीएस हाऊस, ९० फिट डिपी रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या बाजूला, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.