ICSE

ICSE

आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

PUBLISH DATE 2nd December 2022

काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (Council for the Indian School Certificate Examinations, ISCE)ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या परीक्षांसदर्भात अपडेट जाहीर करण्याात आले आहे.

यानुसार बारावीची परीक्षा १३ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २७ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे.

आयसीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cisce. org वर सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

परीक्षेच्या तारखांसोबतच मंडळाने निकालाची तारखेसंदर्भातही अपडेट देण्यात आली आहे. दहावी, बारावीचे निकाल मे २०२३ मध्ये जाहीर केले जाणार आहेत. अधिकृत प्रकाशनानुसार आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा २७ फेब्रुवारीपासून इंग्रजी भाषेसह सुरू होतील. बोर्डाच्या परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असेल. इयत्ता दहावी, बारावीच्या वेळापत्रकात पेपर लिहिण्याच्या वेळेशिवाय प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटे देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे देखील नमूद केली आहेत.


महत्वाच्या बाबी


विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेत जेवढे प्रश्न नमूद केले आहेत तेवढेच प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिला जातो.

उत्तरपत्रिकेवरील सर्व नोंदी केवळ काळ्या/निळ्या बॉल-पॉइंट पेनने केल्या पाहिजेत.

कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण, हात, डेस्क किंवा इतर प्रकारचे कॅल्क्युलेटिंग मशीन वापरण्याची परवानगी नाही.

रफ वर्कसह सर्व काम त्याच शीटवर केले पाहिजे ज्यावर उर्वरित उत्तरे दिली आहेत.

या परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना ८ वाजून ४५ मिनिटांनी वितरित केल्या जातील. दुपारी २ वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना १ वाजून ४५ मिनिटांनी वितरित केल्या जातील.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.