Scholarships

Scholarships

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च फेलोशिप २०२१: फेलोशिप परीक्षेसाठी अर्ज सुरु

PUBLISH DATE 2nd July 2021

 इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने वर्ष २०२१ साठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप प्रवेश परीक्षेची (Fellowship 2021)अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु केली आहे.

यासोबतच जेआरएफ परीक्षेसाठी माहिती पत्रक देखील अपलोड करण्यात आले आहे. ३१ जुलै २०२१ ही या परीक्षेची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट main.icmr.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने २०२१ साठी फेलोशिप परीक्षा(Fellowship 2021) ची घोषणा केली आहे. आयसीएमआर जेआरएफ २०२१ (ICMR JRF 2021) परीक्षा १२ सप्टेंबरला होणार आहे. ही कॉम्प्युटर आधारित परीक्षा असणार आहे.
परीक्षेच्या तारखेसहीत पूर्ण शेड्यूल जाहीर केले आहे. या वेळेस ही परीक्षा पीजीएमआर चंदीगड (PGIMER Chandigarh) च्या सहयोगाने आयोजित केली आहे.

आयसीएमआर ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (ICMR JRF) परीक्षा सप्टेंबर २०२१ मध्ये होणार आहे. आयसीएमआरने जाहीर केलेल्या शेड्यूलनुसार,परीक्षा रविवार, १२ सप्टेंबर २०२१ दुपारी ३ पासून संध्याकाळी ४.३० पर्यंत देशाच्या वेगवेगळ्या केंद्रांवर होणार आहे.

नोटिफिकेशन आणि अर्जाची माहिती
आयसीएमआर नवी दिल्ली आणि पीजीआयएमइआर चंदीगडच्या वेबसाइट्सवर या परीक्षेचे नोटिफिकेशन जूनच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया १ जुलैपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरु आहे. ही संभाव्य तारीख आहे.

आयसीएमआर जेआरएफ काय आहे ?
आयसीएमआर जेआरएफ परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही देशातील कोणतेही मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, युनिव्हर्सिटी किंवा नॅशनल लॅबोरेटरीमध्ये पीएचडी (PhD), रिसर्च (Research) साठी प्रवेश घेऊ शकतात. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या १५० उमेदवारांना फेलोशिप दिली जाईल.

एमएससी, एमए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. यासाठी तुमचे वय २८ वर्षांपेक्षा अधिक असू नये. ओबीसी वर्गासाठी ३ वर्षांची सवलत आणि एससी, एसटी, दिव्यांगांसाठी ५ वर्षांची सवलत मिळेल.

-----------------------------------------------------------------------------------

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च फेलोशिप २०२१: फेलोशिप परीक्षेसाठी अर्ज सुरु
8th February 2024

Scholarship Exam

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च फेलोशिप २०२१: फेलोशिप परीक्षेसाठी अर्ज सुरु
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च फेलोशिप २०२१: फेलोशिप परीक्षेसाठी अर्ज सुरु
15th December 2023

Sarthi Exam

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च फेलोशिप २०२१: फेलोशिप परीक्षेसाठी अर्ज सुरु
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च फेलोशिप २०२१: फेलोशिप परीक्षेसाठी अर्ज सुरु
22nd November 2023

Scholarships To Study In UK