Career Guidance

Career Guidance

करिअरची पंचसूत्री २०२०:जाणून घ्या

PUBLISH DATE 21st September 2020

एकूणच शिक्षण हे ज्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं आहे आणि 'घोका अन् ओका' असं निव्वळ पाठांतरावर आधारित असणारं शिक्षण, उपयोजित व बहुआयामी होत आहे.

ते स्वागतार्ह तर आहेच पण इंडस्ट्री ४.०च्या जमान्यात आणि कोव्हिड-१९ नंतरच्या जगात अपरिहार्यसुद्धा आहे. सर्वच शाखांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शिक्षकांनी, म्हणूनच मी म्हणतो तसं 'गुगल++' करिअर विकसित करणं आवश्यक आहे. म्हणजे असं की गुगलवर माहिती चुटकीसरशी उपलब्ध आहे. पण, त्यातून उभरणारं ज्ञान शोधणं म्हणजे 'गुगल++'!


तर या 'गुगल++' करिअरसाठी मी म्हणेन की पाच महत्त्वाची सूत्रे वापरावीत. पहिलं सूत्र म्हणजे शिक्षण हे एकजिनसी न ठेवता बहुआयामी असावं. दुसरं म्हणजे केवळ माहितीवर न थांबता विश्लेषण आणि खरं तर संश्लेषणात्मक काम करावं. तिसरं म्हणजे एकाच विद्याशाखेतील ज्ञान मिळवण्यावर न थांबता पूरक पदविका/पदवी मिळवावी तीही संलग्न विद्याशाखेत. चौथं म्हणजे शिक्षण हे ईप्सित मुक्कामाचं स्थळ नसून तो निरंतर प्रवास आहे हे पक्कं ध्यानात ठेवावं. या पुढील काळात गिग इकॉनॉमीमध्ये याला पर्याय नाही. पाचवं म्हणजे निव्वळ बुध्यांक (IQ) आधारित न राहता भावनांक (EQ) आणि मानवी भावभावना/नेतृत्व व सामाजिक जाणीव, हे सूत्र. ही पंचसूत्री फार महत्त्वाची ठरेल. या पंचसूत्रीला (Macrosteps) व्यवहारात उतरवायचं असेल तर मी अत्यंत सोप्या, सर्वांना करता येतील अशा खालीलप्रमाणे टिप्स देईन


१. पहिलं म्हणजे स्वतःची बलस्थानं नीट ओळखणं. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बरऱ्यचदा अनेक मुला-मुलींना ती नीट माहिती नसतात किंवा मांडता येत नाहीत, किंवा दोन्ही! म्हणजे 'स्व'ची ओळख होणं आवश्यक आहे.
२. दुसरं म्हणजे पूरक पदवी-पदविकेचं नीट प्लॅनिंग करणं. उदा. तंत्रज्ञानाच्या/अभियांत्रिकीच्या मुलांनी डाटा अॅनॅलिसिस, स्टॅटिस्टिक्स शिकणं. आवड असल्यास मानसशास्त्र शिकणं. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी Excel Macro शिकणं इ.
३. तिसरं म्हणजे डाटा अॅनालिसिससाठी 'R' हे पॅकेज शिकणं. डाटा सायन्सचा IIT चेन्नईचा कोर्स करणं इ.
४. चौथं म्हणजे नवनिर्मिती आणि डिझाइनचे कोर्सेस जे सहज Moocsवर (coursera, edx इ.) उपलब्ध आहेत ते करणं.
५. पाचवं म्हणजे डिजिटल प्रेझेन्स असणं. किमान लिंक्डइनवर अद्ययावत अकाऊंट असणं.
६. सहावं म्हणजे सॉफ्ट स्किल्स किंवा लाइफ स्किल्समध्ये पारंगत होणं. संभाषणकौशल्यं असणं.
७. सातवं म्हणजे ताणतणावाचं नियोजन करता येणं. आजकालच्या जमान्यात हे फारच आवश्यक आहे. यात येईल योग-प्राणायाम-नियमित आहार-विहार व व्यायाम!
८. आठवं म्हणजे Python प्रोग्रॅमिंग शिकणं. अन्य येत असतील तर उत्तमच!
९. नववं म्हणजे मातृभाषा/हिंदी/इंग्रजीबरोबर एखादी परकीय भाषा शिकणं. DuoLingo हे उपयुक्त ठरेल.
१०. दहावं म्हणजे इंटर्नशिप/प्रोजेक्टचा प्रत्यक्षानुभव असणं. यात internshala.com वगैरे उपयुक्त ठरेल.
११. अकरावं म्हणजे सामान्यज्ञान वाढवणं. यात नियमित वर्तमानपत्र वाचन, टीव्हीवरील बातम्या, TED.com उपयुक्तच!
१२. बारावं म्हणजे समाजाभिमुख काम ठरवून, वेळ काढून करणं.ही द्वादशपदी तुम्हाला गुगल++ करिअर देईल.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


करिअरची पंचसूत्री २०२०:जाणून घ्या
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

करिअरची पंचसूत्री २०२०:जाणून घ्या
6th February 2024

Career In Fashion Designing

करिअरची पंचसूत्री २०२०:जाणून घ्या
1st January 2024

AI Trends 2024

करिअरची पंचसूत्री २०२०:जाणून घ्या
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

करिअरची पंचसूत्री २०२०:जाणून घ्या
25th December 2023

Skill Development Courses 2024

करिअरची पंचसूत्री २०२०:जाणून घ्या
25th December 2023

UPSC Free Coaching

करिअरची पंचसूत्री २०२०:जाणून घ्या
23rd December 2023

Career Tips

करिअरची पंचसूत्री २०२०:जाणून घ्या
14th December 2023

Career Tips

करिअरची पंचसूत्री २०२०:जाणून घ्या
8th December 2023

Career Options for Arts Stream

करिअरची पंचसूत्री २०२०:जाणून घ्या
28th November 2023

Career In Railways