भारतातील कायद्याचे (Law) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फेसबुक इंडियातर्फे लॉच्या विद्यार्थ्यांसाठी इंडिया टेक स्कॉलर्स प्रोग्राम होणार आहे.
फेसबुक इंडियाने यासंदर्भात नुकतीच घोषणा केली आहे. देशातील कायद्याचे शिक्षण देणाऱ्या अग्रगण्य संस्थांमधील विद्यार्थी निवडून त्यांना तंत्रज्ञान कायद्याशी संबंधित विषयांवर संशोधन आणि मार्गदर्शन करणे हा यामागचा हेतू आहे.
२०२०-२१ च्या पहिल्या सत्रासाठी निवडल्या गेलेल्या ८ विद्यार्थ्यांना देशातील आघाडीच्या संशोधकांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातही यांचे मार्गदर्शन कायम राहणार आहे.
नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडीया युनिव्हर्सिटी बंगळुरु, WB नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरीडीक्शल सायन्स-कोलकाता, द नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी-दिल्ली आणि द नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी-जोधपूरमध्ये चौथ्या आणि पाचव्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे.
तंत्रज्ञान कायदा क्षेत्रात वेगाने बदलणारी परिस्थिती आणि देशातील कायदे पाहता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी भविष्यातील धोरणांवर आपले मत व्यक्त करु शकतील असे फेसबुक इंडियातर्फे सांगण्यात आले आहे. भविष्यात अधिक विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम असेल असेही त्यांनी सांगितले आहे.
एफआयटीएस प्रोग्राम २०२०-२१ मध्ये सेंटर फॉर इंटरनेट आणि सोसायटी, द ऑब्सर्व्हर रिसर्च फाऊंडेशन, द कॅरनेज इंडोन्मेंट फॉर इंटरनॅशन पीस इंडिया आणि सॉफ्टवेअर फ्रीडम लॉ सेंटर या अग्रगण संस्था मार्गदर्शन करणार आहेत. तसेच फेसबुकतर्फे देखील अनुभवी आणि तज्ञांच्या समितीचे मार्गदर्शन या प्रोग्रामदरम्यान होणार आहे. शार्दूल अमरचंद मंगलदास आणि कंपनी याचे नॉलेज पार्टनर आहेत.
२० जून ही यासंदर्भातील अर्जाची शेवटची तारीख आहे. एफटीआयएसचा हा प्रोग्राम ९ महिन्यांचा असणार आहे.
-----------------------------------------------------------------------------------
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा
राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू
TFSW - 'शिक्षण शुल्क माफी' योजना
Cyprus Institute Of Neurology And Genetics Offering Scholarships