एफटीआयआय नेऑनलाइ फिल्म अॅप्रिसिएशन कोर्स उपलब्ध केला आहे. दिग्दर्शक अरुणाराजे पाटील हा कोर्स शिकवणार आहेत.
२४ दिवसांचा हा कोर्स असून तो सोमवार ते शुक्रवार घेण्यात येईल. सकाळी ११ ते १ आणि संध्याकाळी ५ ते ६ अशा दोन इंटरअॅक्टिव्ह सेशन्समध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. Google क्लासरुमच्या आणि गुगल मीटच्या माध्यमातून हे वर्ग घेतले जातील. या ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी ५० उमेदवारांची निवड केली जाईल.
वयाची १८ वर्षे पूर्ण केलेला आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला कोणीही या कोर्सला प्रवेश घेऊ शकतो. अर्जात दिलेली माहिती आणि अभ्यासक्रम शिकण्याचा उद्देश लक्षात घेऊन उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे. ९० टक्क्यांहून अधिक उपस्थिती असणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
अर्ज कसा करायचा?
एफटीआयआयच्या संकेतस्थळावर ftii.ac.in जा.
FTII online या पर्यायावर क्लिक करा. तेथून online film appreciation course या पर्यायावर क्लिक करा.
नोटीस वाचा आणि शेवटी apply online या पर्यायावर क्लिक करा.
अर्ज भरा आणि सबमीट करा.
शुल्क किती?
अर्जाचे शुल्क ८०० रुपये आहे तर अभ्यासक्रमाचे शुल्क ९ हजार रुपये आहे.
या अभ्यासक्रमात बेसिक इंट्रोडक्शन टू थिऑरिटीकल स्टडी ऑफ आर्ट, हिस्ट्री ऑफ फिल्म, डेव्हलपमेंट ऑफ सिनेमा अॅज अ मीडिअम ऑफ आर्ट अँड कम्युनिकेश हे विषय शिकवले जातील, असा एफटीआयआयचा दावा आहे. सिनेमाच्या चळवळींपासून विविध जेनरही शिकवले जातील.
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
For all latest Govt Jobs 2019, Railway Jobs, Bank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा
FTII offers online course on ‘appreciation of Indian cinema’ 2020
FTII, SRFTI JET 2020: The online application process will be closed soon
एफटीआयआय च्या प्रवेश परीक्षा शुल्कामध्ये विशेष सवलत
Two-week film course rolls out
Film and television starts basic acting course for children
FTII launches special course on web series