Career Guidance

Career Guidance

वाटा करिअरच्या २०२२: फॉरेन्सिक अकौंटंटस्‌

PUBLISH DATE 26th November 2022

आपल्या देशात आर्थिक घोटाळ्यांच्या चर्चा या नित्यनेमाने सुरू असतात. सरकारी कारभारात, सरकारी आस्थापनांमध्ये, बँकांमध्ये, कंपन्यांमध्ये, सहकारी संस्थांमध्ये काही कोटींचा घोटाळा, कंपनीला टाळे अशा आशयाच्या बातम्या अनेकदा आपल्याला ऐकू येत असतात.

हे घोटाळे शोधून काढणे, तो कशाप्रकारे झाला, किती झाला या गोष्टीची सखोल तपासणी करण्यासाठी बुद्धिमान आणि चतुर हिशेबनीसाची गरज असते. अशा सखोल तपासाच्या कामाशी निगडित असतात फॉरेन्सिक अकौंटंट. हे अकौंटंटस् शोध सेवा आणि खटला चालवण्यासाठी मदतनीस म्हणून काम करत असतात.

फॉरेन्सिक अकौंटंटस् हे दोन प्राथमिक क्षेत्रात काम करतात. त्यापैकी एक म्हणजे तपासक्षेत्र व दुसरे खटला चालवण्यात कायदेशीर तपशील देण्यासाठी सहायक म्हणून. तपासाशी निगडित असलेल्या अकौंटिंगमध्ये कंपनीचा दस्तऐवज आणि एकूण आकडेवारी व्यतिरिक्त कंपनीचा कारभार कशा पद्धतीने चालतो याचा तपशील बघणेही समाविष्ट होते. फॉरेन्सिक अकौंटंटस् हे एखाद्या उद्योगाचा समस्त वित्तीय कार्याचा तपास करून एक अहवाल तयार करतात. याचा उपयोग गुन्हे क्षेत्रात आणि सिव्हिल न्यायालयातील विविध कार्यवाहीसाठी केला जातो. हे अकौंटंटस् न्यायालयात पुरावा म्हणून आवश्यक असणारे कागदपत्र गोळा करतात. तसेच कंपनी व्यवस्थापन किंवा कायदेशीर एजन्सीजच्या प्रयोगाआधी रिपोर्ट तयार करतात.

हे काम वर-वर हिशेबनीसासारखे दिसत असले तरी फॉरेन्सिक अकौंटंटस् हे तपासात सामान्य हिशेबनीसापेक्षा अधिक सक्रिय असतात. तसेच काम करताना मनात सतत संशय बाळगून आणि सतर्क द़ृष्टिकोन ठेवून त्यांना काम करावे लागते. बहुतेक निष्कर्ष संगणकाच्या सहाय्यानेच काढले जातात. त्यामुळे संगणकाचे उत्तम ज्ञान आणि सॉफ्टवेअरची सखोल माहिती असणे गरजेचे असते. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती न्यायालयात नेहमीच प्रमुख साक्षीदाराच्या रूपात महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात. गरज वाटल्यास एखाद्या वेळी त्यांना आपल्या तपासाच्या निष्कर्षाबाबत प्रमाणही प्रस्तुत करावे लागते. या क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती न्यायालयीन तपासासंबंधी तसेच सीआयडी, सीबीआय, वकील, इन्शुअन्स कंपनी, उद्योगपती किंवा सेबी अथवा सीएफआयओ सोबत काम करतात. थोडक्यात या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍यांसाठी संधीची अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत.

फॉरेन्सिक अकौंटंटस रूपात करिअर बनवण्यासाठी तुमच्या जवळ सर्व प्रथम अकौंटिंगची पदवी हवी. भारतातील बहुतेक फॉरेन्सिक अकौंटंटस् सर्टिफाईड फॉरेन्सिक अकौंटिंग प्रोफेशन्स आहेत. या क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षण देणारा भारतातील हा एकमेव कोर्स आहे. या कोर्स व्यतिरिक्त उमेदवाराला कायदा लागू करण्याचे तसेच गुन्हेगारी कायदा कोणता? यासारख्या क्षेत्रातील अतिरिक्त माहिती असणेही आवश्यक असते. म्हणूनच कुठल्याही प्रकारचे, व्यवसायात सहाय्यभूत होईल असे कायदेशीर प्रशिक्षणही यासाठी आवश्यक आहे. भारतात आर्थिक घोटाळ्याच्या घटना वाढत असल्यामुळे त्यांचा थेट परिणाम बँकांवर पडतो.

म्हणून बँकामध्येही नियंत्रण समितीची गरज असते. त्यांच्या मदतीने बँकिंग प्रणाली सुरक्षित ठेवता येते. अशा समितीमध्ये नियुक्त असणारे कर्मचारी, विश्लेषक संभाव्य धोके आणि अन्य संभाव्य घोटाळ्यांवर देखरेख ठेवत असतात. बँकिंग घोटाळ्याच्या घटनांचा शोध लावण्यासाठी आणि घोटाळा सिद्ध करण्यासाठी ‘सर्टीफाईड बँक फॉरेन्सिक अकौंटिं’ हा कोर्स राबवला जातो. या कोर्स अंतर्गत चेक फसवणूक, काळा पैसा पांढरा करण्याची घटना, पारंपरिक घोटाळे याबाबत सखोल अभ्यास केला जातो.

हा कोर्स म्हणजे भारतात आतापर्यंत झालेल्या निरनिराळ्या बँकिंग घोटाळ्यांचा शोध परिणाम आहे. त्यामुळे हा कोर्स भारतीय बँकांमधील घोटाळे रोखण्यासाठी बराच प्रभावी सिद्ध झाला आहे. भारतात फॉरेन्सिक अकौंटंटस् आणि अँटी-फ्रॉड प्रोफेशनल्सना चांगले वेतनही मिळते. अकौंटिंगची आवड असलेल्यांना जरा वेगळ्या वाटेचे, थोडेसे जबाबदारीचे आणि आव्हानात्मक असे हे क्षेत्र करिअर म्हणून निवडायला काही हरकत नाही.

योगेश देसाई

------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


वाटा करिअरच्या २०२२: फॉरेन्सिक अकौंटंटस्‌
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

वाटा करिअरच्या २०२२: फॉरेन्सिक अकौंटंटस्‌
6th February 2024

Career In Fashion Designing

वाटा करिअरच्या २०२२: फॉरेन्सिक अकौंटंटस्‌
1st January 2024

AI Trends 2024

वाटा करिअरच्या २०२२: फॉरेन्सिक अकौंटंटस्‌
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

वाटा करिअरच्या २०२२: फॉरेन्सिक अकौंटंटस्‌
25th December 2023

Skill Development Courses 2024

वाटा करिअरच्या २०२२: फॉरेन्सिक अकौंटंटस्‌
25th December 2023

UPSC Free Coaching

वाटा करिअरच्या २०२२: फॉरेन्सिक अकौंटंटस्‌
23rd December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: फॉरेन्सिक अकौंटंटस्‌
14th December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: फॉरेन्सिक अकौंटंटस्‌
8th December 2023

Career Options for Arts Stream

वाटा करिअरच्या २०२२: फॉरेन्सिक अकौंटंटस्‌
28th November 2023

Career In Railways