Scholarships

Scholarships

पुणे महानगरपालिका शैक्षणिक अर्थसहाय्य योजना २०२१

PUBLISH DATE 7th October 2021

पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आणि इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजने अंतर्गतपुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे.  एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रकमेतून समान रक्‍कम किंवा इ.१० वी करिता रक्‍कम रु. १५०००/- व इ. १२ बी करिता रक्‍कम रु. २५०००/- अर्थसहाय्य देणेची योजना आहे.

सदरचे अर्थसहाय्य उपलब्ध रक्कम व प्राप्त अर्ज यांचा विचार करून देण्यात येणार आहे. इ. १० वी व इ. १२ वी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुधारित शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत खालील नियम व अटीत बसणाऱ्या मुलांच्या पालकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या डीबीटी वेबसाईटवर भरणे आहे.


१. सन २०२१ (फेब्रुवारी-मार्च) या शैक्षणिक वर्षात इ. १० वी/इ. १२ वी मध्ये कमीत कमी ८०% गुण मिळणे आवश्यक आहे.तथापि पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी/रात्रशाळेतील विद्यार्थी/ मागासवर्गीय विद्यार्थी यांनी किमान ७०% आणि ४०% दिव्यांगत्वअसलेल्या विद्यार्थ्यांना/ कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित, कष्टकरी कामगारांच्या मुलांना किमान ६५% गुण मिळणे आवश्यक आहे.

 २. शैक्षणिक अर्थसहाय्य हे इ. १०/ १२ वी नंतर शासनमान्य/ विद्यापीठ मान्य संस्थेत प्रवेश घेतला असल्यासच मिळेल.

उपरोक्‍त योजनेचे अर्ज दि. १३ ऑक्टोबर २०२१ ते दि. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर भरण्यात यावेत. या बाबतचा तपशील व अटी व शर्ती या पुणे महानगरपालिकेच्या   http://dbt.punecorporation.org/ या संकेतस्थळावर बघण्यात यावे.

 
मौलाना अबुल कलाम आझाद इ. १० उत्तीर्ण विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य -(YWS)

रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा यांपैकी एक जोडणे आवश्यक.
अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक.
वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.
मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे व अपंगांनी अपंगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक राहील.
बोर्ड मार्कशीट तसेच CBSE & ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळेचे टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. इयत्ता १० वी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याना ८०% पेक्षा जास्त गुण, पुणे महानगरपालिकेच्या शाळेत अथवा रात्र प्रशालेत शिकत असलेले विध्यार्थी, मागासवर्गीय प्रवर्गातील विध्यार्थी यांना ७०% पेक्षा जास्त गुण, तसेच ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी लाभासाठी पात्र ठरतील.
महाविद्यालय प्रवेश शुल्क पावती जोडणे आवश्यक. महाविद्यालय प्रमुखाच्या शिफारसीमधील सर्व रकाने भरणे आवश्यक.
दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
इयत्ता १० वी नंतर शासनमान्य वा विद्यापीठ मान्य संस्थेत कोणत्याही एका शाखेत प्रवेश घेतला असल्यास शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येईल.
पुणे महानगरपालिका अर्थसंकल्पातील उपलब्ध तरतुदीपेक्षा एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास अर्जदारांना समान रक्कम किंवा कमाल रक्कम रु. १५,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल.
मूळ कागदपत्रे जोडू नयेत. जोडल्यास परत दिली जाणार नाही.
उपलब्ध आर्थिक तरतूद व नियम अटींचा विचार करून अर्ज नाकारण्याचा वा स्वीकारण्याचा अधिकार मा. मुख्य समाज विकास अधिकारी, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इ. १२ उत्तीर्ण विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य -(YWS)


•    रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
•    कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती / भाडे करारनामा यांपैकी एक जोडणे आवश्यक..
•    अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक .
•    वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.
•    मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे व अपंगांनी अपंगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक राहील.
•    इयत्ता १२ वी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याना ८०% पेक्षा जास्त गुण असावेत. पुणे महानगरपालिकेच्या शाळेत अथवा रात्र प्रशाला शिकत असलेले विध्यार्थी, मागासवर्गीय प्रवर्गातील विध्यार्थी यांना ७०% पेक्षा जास्त गुण आवश्यक. तसेच ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे
•    महाविद्यालय प्रवेश शुल्क पावती जोडणे आवश्यक. महाविद्यालय प्रमुखाच्या शिफारसीमधील सर्व रकाने भरणे आवश्यक.
•    दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही
•    इयत्ता १२ वी नंतर शासनमान्य वा विद्यापीठ मान्य संस्थेत कोणत्याही एका शाखेत प्रवेश घेतला असल्यास शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येईल.
•    पुणे महानगरपालिका अर्थसंकल्पातील उपलब्ध तरतुदीपेक्षा एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास अर्जदारांना समान रक्कम किंवा कमाल रक्कम रु. २५,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल.
•    मूळ कागदपत्रे जोडू नयेत. जोडल्यास परत दिली जाणार नाही.
•    उपलब्ध आर्थिक तरतूद व नियम अटींचा विचार करून अर्ज नाकारण्याचा वा स्वीकारण्याचा अधिकार मा. उप आयुक्त, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.
•    स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न करणे आवश्यक आहे.

-----------------------------------------------------------------------------------

शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ मोफत ऑनलाईन सराव परीक्षा

Registration Link- https://vidyarthimitra.org/abvpmockexam

----------------------------------------------------------------------------------

Engineering Aptitude Test organise jointly with DIPEX & ABVP, Maharashtra

Register now- https://vidyarthimitra.org/abvpapti

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


पुणे महानगरपालिका शैक्षणिक अर्थसहाय्य योजना २०२१
8th February 2024

Scholarship Exam

पुणे महानगरपालिका शैक्षणिक अर्थसहाय्य योजना २०२१
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

पुणे महानगरपालिका शैक्षणिक अर्थसहाय्य योजना २०२१
15th December 2023

Sarthi Exam

पुणे महानगरपालिका शैक्षणिक अर्थसहाय्य योजना २०२१
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

पुणे महानगरपालिका शैक्षणिक अर्थसहाय्य योजना २०२१
22nd November 2023

Scholarships To Study In UK