Career Guidance

Career Guidance

अभियांत्रिकी आणि सरकारी नोकरी

PUBLISH DATE 14th August 2024

यांत्रिकी अभियांत्रिकी हे महत्त्वाचे आणि विस्तृत क्षेत्र आहे. त्यामध्ये विविध तंत्रज्ञानांचा समावेश आहे. आपण यांत्रिकी अभियांत्रिकीतील काही महत्त्वपूर्ण नवकल्पना आणि त्यांच्याशी संबंधित करिअरची माहिती घेऊया!

थ्रीडी प्रिंटिंग

थ्रीडी प्रिंटिंग किंवा अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग हे एक नवतंत्रज्ञान आहे. त्यामुळे वस्तूंचे मॉडेलिंग आणि उत्पादन सुलभ होते. या तंत्रज्ञानाचा वापर ऑटोमोटिव्ह, वैमानिक, वैद्यकीय आणि अनेक इतर उद्योगांमध्ये केला जातो.

रोबोटिक्स आणि ऑटोमेशन

रोबोटिक्स आणि ऑटोमेशनच्या क्षेत्रात यांत्रिक अभियंत्यांना मोठ्या संधी आहेत. उद्योगातील उत्पादन प्रक्रियेमध्ये रोबोटिक्सचा वापर वाढतो आहे. रोबोटिक्स इंजिनियर, ऑटोमेशन इंजिनियर आणि कंट्रोल सीस्टिम इंजिनिअर यांसारख्या पदांसाठी यांत्रिक अभियंत्यांना मागणी आहे.

एआय आणि मशिन लर्निंग

AI आणि ML चा वापर यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये वाढत आहे. याचा उपयोग उत्पादन प्रक्रिया सुधारण्यासाठी, गुणवत्ता नियंत्रणासाठी आणि देखभाल व भविष्याचा अंदाज घेण्यासाठी केला जातो. तसेच, डेटा सायंटिस्ट आणि मशीन लर्निंगतज्ज्ञ यांसारख्या पदांसाठीही संधी उपलब्ध आहेत.

स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्री ४.०

इंडस्ट्री ४.० हे औद्योगिक उत्पादनात तंत्रज्ञानाच्या प्रगत वापराचे युग आहे. इंटरनेट ऑफ थीम्ज (IoT), बिग डेटा, सायबर फिजिकल सीस्टिम आणि ए.आय.चा वापर केला जातो. अभियंत्यांना स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग तज्ज्ञ आणि डेटा अॅनालिस्ट म्हणून संधी आहेत.

मटेरिअल सायन्स आणि नॅनो तंत्रज्ञान

मटेरिअल सायन्स आणि नॅनो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन प्रकारचे साहित्य आणि तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. याचा उपयोग वैद्यकीय उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स, आणि उत्पादन क्षेत्रात होतो. मटेरियल सायंटिस्ट, नॅनो तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि संशोधन व विकास अभियंता यांसारख्या पदांसाठी संधी आहेत.

इलेक्ट्रिक वाहने

ऑटोमोटिव्ह उद्योगात इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासामुळे नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचे डिझाइन, बॅटरी तंत्रज्ञान आणि ऊर्जा व्यवस्थापन या क्षेत्रात संधी आहे.

बायोमेडिकल इंजिनिअरिंग

बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये यांत्रिक अभियांत्रिकीचा वापर वैद्यकीय उपकरणे, प्रोस्थेटिक्स आणि इम्प्लांट्स विकसित करण्यासाठी केला जातो. हे क्षेत्र वैद्यकीय तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि संशोधनासाठी मोठ्या संधी देत आहे.

व्हर्चुअल रिअॅलिटी, ऑग्मेंटेड रिअॅलिटी

VR आणि AR तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन प्रक्रिया, प्रशिक्षण आणि सिम्युलेशनमध्ये वाढत आहे. VR/AR इंजिनियर, सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि सिम्युलेशन तज्ज्ञ म्हणून यांत्रिकी अभियंत्यांना करिअरच्या संधी आहेत.

सरकारी क्षेत्रातील संधी

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU)

भारतीय रेल्वे -रेल्वे इंजिन, डबे, ट्रॅक, सिग्नलिंग आणि इतर यंत्रसामग्रीच्या देखरेखीसाठी यांत्रिकी अभियंते आवश्यक असतात. भारतीय रेल्वे अभियंता सेवा (IRSME) या सेवेत भरपूर संधी आहेत.

इस्रो- अभियंत्यांना सॅटेलाइट, लाँच व्हेइकल्स आणि ग्राउंड सपोर्ट उपकरणांच्या डिझाइन आणि विकासात काम करण्याची संधी इस्रोकडून दिली जाते.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) - यामध्ये पॉवर प्लांट उपकरणे, औद्योगिक यंत्रे आणि इतर उत्पादनांमध्ये संधी मिळते.

संरक्षण क्षेत्र

भारतीय संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) - या संस्थेत संरक्षण उपकरणे, शस्त्रे आणि वाहनांच्या विकासात काम करण्याची संधी मिळते. संशोधन आणि विकास क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यांना महत्त्वपूर्ण भूमिका बजावता येते.

सशस्त्र दले- भारतीय नौदल, वायुसेना, आणि लष्कर यांसारख्या संरक्षण विभागांमध्ये अभियंत्यांना युद्धनौका, विमान आणि अन्य उपकरणांच्या देखरेखीसाठी काम करण्याची संधी मिळते.

ऊर्जा आणि पर्यावरण विभाग

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) - या संस्थेत न्युक्लिअर पॉवर प्लांट्सच्या डिझाइन, देखरेख आणि संचालनासाठी यांत्रिकी अभियंत्यांना संधी आहे.

भारत पेट्रोलियम, ओएनजीसी - तेल आणि वायू क्षेत्रात यांत्रिक अभियंत्यांना रिफायनरी, पाइपलाइन आणि ड्रिलिंग रिग्स यांसारख्या उपकरणांच्या देखरेख आणि संचालनासाठी काम करण्याची संधी मिळते.

शैक्षणिक आणि संशोधन संस्था

आआयटी - IISC, IIT आणि इतर प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये यांत्रिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक, संशोधन वैज्ञानिक आणि इतर शिक्षणाशी संबंधित पदांसाठी संधी आहेत.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.