उच्च शिक्षण घेऊन करिअर करण्याची इच्छा तशी प्रत्येकाचीच असते. तथापि, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेकांना ते शक्य होत नसे. मुले हुशार असली तरी पैसे नसल्याने त्यांना उच्च शिक्षण देण्याच्याबाबतीत पालक असमर्थ ठरत होते. दरम्यान हे चित्र आता बदलले आहे.
आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या पार्श्वभूमीवर, संबंधितांसाठी अत्यंत वरदान ठरणारी शैक्षणिक कर्ज योजना अंमलात आणली आहे. या योजनेमुळे बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेऊन नोकरी वा चांगला व्यवसाय थाटण्याचे स्वप्न सर्वसामान्य अन् गोरगरीब विद्यार्थ्यांचे पूर्ण होत आहे. फक्त आलेल्या संधीचे सोने करण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता हवी.
शैक्षणिक कर्ज योजनेची वैशिष्ट्ये
शैक्षणिक कर्ज योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे.
शैक्षणिक कर्ज योजनेत अत्यंत कमी व्याजदर आकारला जातो.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करण्यासाठी शैक्षणिक कर्ज योजनेची सुरवात करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
शिक्षणासाठी कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
या योजनेच्या साहाय्याने विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतील व भविष्यात नोकरी मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील.
शैक्षणिक कर्ज योजनेचे फायदे
गरीब कुटुंबातील ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी १० लाखापर्यंत कर्ज उपलब्ध केले जाते.
विद्यार्थ्यांना जे शिक्षण कर्ज दिले जाते, त्यावर केवळ ३ टक्के व्याजदर आकारला जातो.
विद्यार्थ्यांच्या कोर्सचा खर्च तसेच तो राहत असलेल्या वसतिगृहाचा खर्च या शिक्षण कर्ज योजने मार्फत दिला जातो.
जो पर्यंत विद्यार्थी त्याचे शिक्षण पूर्ण करत असतो तो पर्यंत त्याच्या शिक्षणासाठी कर्ज दिले जाते.
शिक्षण कर्जाच्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण सोडावे लागत नाही तसेच त्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करता येते.
शिक्षण कर्जामुळे विद्यार्थ्याला आत्मविश्वास येतो.
या योजनेअंतर्गत शिक्षणासाठी दिले जाणारे कर्ज फेडण्याची मुदत जास्त दिले जाते.
शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा तो नोकरीला लागतो तेव्हा ६ महिन्यांपासून ५ वर्षांपर्यंत हे कर्ज परत करायचे असते.
शिक्षण घेत असताना विद्यार्थी फक्त व्याजाची रक्कम जमा करू शकतो त्याला शिक्षण घेत असताना कर्जाची रक्कम भरायची गरज नाही.
कर्जाची मूळ रक्कम नोकरीला लागल्यावर ६ महिन्यांपासून ५ वर्षापर्यंत भरली तरी चालते.
विद्यार्थ्याला त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा सार्वजनिक किंवा संस्था यांच्यामार्फत शिक्षण कर्ज दिले जाते.
शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करण्याची पद्धत
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन आहे. विद्यार्थ्याला तो राहत असलेल्या ठिकाणाच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन शिक्षण कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे (सदर बँक शिक्षण करण्यासाठी कर्ज देत असल्याची खात्री करावी) अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी. परिपूर्ण अर्ज बँकेत जमा करावा. बँक मॅनेजर अर्ज आणि जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करेल व कागदपत्रे योग्य असल्यास विद्यार्थ्याला शिक्षण कर्जासाठी पात्र ठरवून कर्ज प्रदान करेल.
--------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.