Career Guidance

Career Guidance

वाटा करिअरच्या २०२२: सीएनसी टेक्नॉलॉजी आणि कॅड/कॅम

PUBLISH DATE 22nd June 2022

संकेत स्वरूपातील नियंत्रण हे आजच्या यंत्रयुगातील सर्वप्रकारच्या उत्पादक प्रक्रिया, वस्तू हाताळणी आदी यंत्रांचा अविभाज्य भाग बनला आहे.

मोठ्या संख्येत उत्पादन करणाऱ्या मशिनमध्ये ऑटोमेशन प्रणालीचा समावेश असल्याने प्रोग्रॅम केल्यानुसार वस्तूंचे उत्पादन अखंडितपणे सुरू राहते. बहुतांशी अशा मशिन फक्त ठराविक प्रकारचे अतिविशिष्ट स्वरूपाचे वस्तू उत्पादन करण्यातच अतुलनीय ठरतात.

ठराविक किंवा छोट्या संख्येत वस्तू उत्पादन करणाऱ्या मशिनचे असंख्य प्रकार औद्योगिक क्षेत्रात पाहावयास मिळतात. विविध प्रकारचे उत्पादन अशा मशिनवर करता येते. त्यामुळे अशा मशिन हाताळणे व योग्य प्रकारे वापरण्यासाठी प्रशिक्षित व कौशल्यसंपन्न मनुष्यबळ हा अभियांत्रिकी उत्पादनातील महत्त्वाचा घटक आहे.

उत्तरोत्तर उत्पादन तंत्रज्ञानात प्रगती झाली. बहुसंख्येत एकाच प्रकारचे उत्पादन करणाऱ्या मशिन आणि अल्प संख्येत विविध प्रकारचे उत्पादन करणाऱ्या मशिन यांना सामाईक ठरणाऱ्या मशिन टूलचा वापर तीन दशकांपासून अभियांत्रिकी उत्पादनात या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ संख्यात्मक नियंत्रण (Numerically controlled)मशिनद्वारे साध्य केला जातो. अपेक्षित कार्य करण्यासाठी संख्यात्मक माहिती विकसित केलेल्या संकेतात्मक भाषेत एनसी मशिन टूलला दिली जाते. सुरुवातीच्या काळात ही माहिती पेपर टेपवर देत असत. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे याची जागा कॉम्प्युटरने घेतली. ऑटोमॅटिकली प्रोग्रॅम्ड टूल ही प्रोग्रॅम भाषा विकसित झाली. कॉम्प्युटर न्यूमिरिकल कंट्रोल (CNC), डायरेक्टर न्यूमिरिकल कंट्रोल (DNC), कॉम्प्युटर एडेड डिझाईन (CAD), कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग, अॅडॅक्टिव्ह कंट्रोल (AC), आणि इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग सिस्टिम अशा संकल्पनेचा उदय झाला.

संगणकीय तंत्रज्ञान

पदार्थांची किंवा वस्तूंची रचना (डिझाईन), विश्लेषण (अॅनालिसिस) आणि उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग)साठी संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर होतो. संगणकीय तंत्रज्ञानात वस्तूंच्या आयुष्यचक्र व्यवस्थापनाच्या विविध अंगांचा विचार केला जातो. यामध्ये डिझाईन, सूक्ष्म घटकांचे विश्लेषण (एफईए), उत्पादन उत्पादन नियोजन, वस्तू चाचणी, वस्तू माहिती किंवा सल्ला इत्यादी टप्प्यांवर संगणकीय तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्याने वस्तू हा रचना आणि विकास हा इष्टतम पातळीवर साध्य केला जातो.

कॅड किंवा कॅम (कॉम्प्युटर एडेड डिझाईन आणि कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग) संगणकीय तंत्रज्ञान अभियांत्रिकीच्या अनेक क्रियांसाठी वापरले जात आहे. सीएनसी व त्यासारखी प्रणाली कोणत्याही उत्पादन प्रकियेसाठी वापरली जाऊ शकते. अभियांत्रिकी उत्पादनातील उच्चतम अचूकतेसाठी सीएनसी प्रणालीला औद्योगिक क्षेत्रात प्राधान्य मिळाले आहे. लेथ किंवा मिलिंग मशिन, प्लाझ्मा कटिंग, वाटर जेट कटिंग, लेझर कटिंग, सरफेस किंवा सिलेंड्रिकल, ग्राइंडिंग मशिन आदी सीएनसी प्रणाली अधिष्ठित मशिन औद्योगिक उत्पादनात प्रभावी ठरल्या आहेत.

आधुनिक सीएनसी प्रणालीमध्ये घटक किंवा पदार्थ किंवा वस्तू रचनेमध्ये (डिझाईन) कॅड किंवा कॉम प्रोग्रॅमद्वारे ऑटोमेशन होते. या प्रोग्रॅम आधारे सांकेतिक भाषेत सीएनसी मशिनला संदेश देऊन अपेक्षित उत्पादन प्रक्रिया पूर्ण होते. संगणकीय तंत्रज्ञानाचा नवीन वस्तूच्या संकल्पनेपासून ते थेट वस्तू निर्मिती व नंतर गुणवत्ता आश्वासनापर्यंत सर्व थरांवर उपयोजन झाले आहे.

औद्योगिक उत्पादनात, वरील संकल्पनेचा झपाट्याने प्रसार झाला. उद्योगांनीही अशा संकल्पना व मशिनटूलचा उत्पादनासाठी वापर सुरू केला. उच्च तंत्रज्ञानाधिष्ठित उत्पादन प्रक्रियांमुळे उच्चतम अचूकता व उत्पादकता हे धोरण औद्योगिक क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत टिकण्याकरिता स्वीकारावे लागले आहे. सीएनसी टेक्नॉलॉजी आणि कॅड किंवा कॅम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अभियांत्रिकी पदविका किंवा शास्त्र पदवी अथवा आयटीआय उमेदवारांना उत्पादन अभियांत्रिकीतील उद्योगांमध्ये मोठ्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या खुणावतात.

सीएनसी टर्निंग, सीएनसी मिलिंग ईडीएम वायर ईडीएम, ऑटोकॅड, सीएनसी मशिनींग सेंटर, मास्टर कॅम, मेट्रोलॉजी अशा विषयांचे अल्पकालावधीचे सरकारी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सद्य उत्पादन अभियांत्रिकीतील रोजगारासाठी गरजेचे आहेत.

लेखक - राजेश ओहोळ

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


वाटा करिअरच्या २०२२: सीएनसी टेक्नॉलॉजी आणि कॅड/कॅम
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

वाटा करिअरच्या २०२२: सीएनसी टेक्नॉलॉजी आणि कॅड/कॅम
6th February 2024

Career In Fashion Designing

वाटा करिअरच्या २०२२: सीएनसी टेक्नॉलॉजी आणि कॅड/कॅम
1st January 2024

AI Trends 2024

वाटा करिअरच्या २०२२: सीएनसी टेक्नॉलॉजी आणि कॅड/कॅम
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

वाटा करिअरच्या २०२२: सीएनसी टेक्नॉलॉजी आणि कॅड/कॅम
25th December 2023

Skill Development Courses 2024

वाटा करिअरच्या २०२२: सीएनसी टेक्नॉलॉजी आणि कॅड/कॅम
25th December 2023

UPSC Free Coaching

वाटा करिअरच्या २०२२: सीएनसी टेक्नॉलॉजी आणि कॅड/कॅम
23rd December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: सीएनसी टेक्नॉलॉजी आणि कॅड/कॅम
14th December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: सीएनसी टेक्नॉलॉजी आणि कॅड/कॅम
8th December 2023

Career Options for Arts Stream

वाटा करिअरच्या २०२२: सीएनसी टेक्नॉलॉजी आणि कॅड/कॅम
28th November 2023

Career In Railways