Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: करिअर निवड आणि विद्यार्थ्यांची मानसिकता

PUBLISH DATE 3rd June 2022

इयत्ता अकरावीच्या वर्गात एकदा ‘तुमची स्वप्ने काय आहेत?  भविष्यात तुम्हाला काय बनायला आवडेल?’ असे प्रश्न विचारले आणि वर्गात शांतता प्रस्थापित झाली.

बहुतेक हा प्रश्न त्यांना मनात डोकवायला लावणारा होता. साधारणपणे कनिष्ठ महाविद्यालयातील मुले भविष्याविषयी, करिअर निवडायच्या विषयी  थोड्या गांभीर्याने विचार करू लागतात.  मात्र, शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा विचार करायला  सुरुवात होत नाही. 

अर्थात, ही परिस्थिती काही वर्षांपूर्वीची आता शाळा, विद्यार्थी, पालक हे करिअरच्या निवडीबाबत जास्त सजग व्हायला लागले आहेत.

विद्यार्थी स्वयंपूर्ण व्हावेत

दुसऱ्याच्या मनात  शिरून त्याची मानसिकता तपासणे हे एकदम अवघड काम.  त्यातच विद्यार्थ्यांच्या मनात शिरणे हे आव्हानात्मकच.  मुलांच्या मनात काय शिजत असते, याचा पत्ता लागणे अवघडच. त्यांच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारल्यास, तर ते उलगडतात आपल्या मनातील गुज सांगतात. असे जाणवले, की मुले करिअरच्या बाबतीतील निर्णय घेण्यास अजून स्वयंपूर्ण बनलेली नाहीत. आपले आई-वडील सांगतील त्या दिशेने जाण्याची मुलांची मानसिकता सहज दिसून येते. आपल्या आई-वडिलांचे व्यवसाय किंवा तेच क्षेत्र पुढे घेऊन जाण्याची भूमिका सर्व सामान्य दिसते. काही मंडळी मात्र आपल्या मित्रांसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारून आपले भविष्य करण्याच्या मागे लागतात. यात दुसऱ्यांच्या बरोबर नकळत तुलना करण्याची वृत्ती जास्त. त्यात प्रामुख्याने प्रवाहाबरोबर वहात जाणाऱ्यांची संख्या जास्त.

वेगळे करण्याची मानसिकता

‘स्व’ची जाणीव विद्यार्थ्यांना या दरम्यान मोठ्या प्रमाणात झाल्याचे मात्र दिसून येते. आपल्याला भविष्यात ते स्वतःला कसे पाहू इच्छितात यासाठी अनेक विद्यार्थी स्वयंप्रेरित झाल्याचे जाणवते. कोणती शाखा निवडावी हे परीक्षेच्या निकालानंतरच ठरवायची गोष्ट असा समज. परंतु त्याबाबतचा विचार मात्र अगदी आठवी-नववीपासून करणे गरजेचा आहे, हे आता काही मुलांना वाटते. त्या विषयाचे मार्गदर्शन शाळेतच मिळावे, अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली. ते मिळत नाही आणि बऱ्याचदा विद्यार्थी संभ्रमावस्थेत राहतात. ही अवस्था शहरी मुलांची, ग्रामीण विभागातील अवस्था मात्र अजूनही मागेच. माहिती समुपदेशन, मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतच नाही. असे जाणवले, की मुलांची नजर धावत असते आणि आपल्या अवतीभवतीचे व्यवसाय, नोकऱ्या, धंदे ते पाहात असतात. मात्र, एकदम हटके, वेगळे काही करण्याची त्यांची मानसिकता मात्र तयार झालेली नसते. घरच्यांचा प्रभाव, सभोवताली असणारे व्यवसाय, जवळपास राहणारे आपले शेजारी यांच्या क्षेत्राचा निवडीवर ती परिणाम होतो, असे काहींचे मत. बऱ्यापैकी सुरक्षित, पैसेवाला जॉब निवडणे, आपल्यासमोर काही आदर्श ठेऊन करिअरची निवड करणे हे काहीजणांना आवश्यक वाटते.

आपल्याला काय जमणार नाही काय अडचणी येतील, हे विचार घेऊन निर्णय घेतला जातो. प्रवेश परीक्षांमधून येणाऱ्या निर्णयावरतीसुद्धा कोणते करिअर निवडायचे हे अवलंबून ठेवतात. विद्यार्थ्यांची मल्टिटास्किंगची तयारीसुद्धा तुफान असते. ही मानसिकता लक्षात घेता खरेतर कोणतेही करिअर, व्यवसाय, नोकरी कधीही वाईट नसते; आवश्यक असते आपण त्यात किती मन लावून काम करतो याची आणि ‘ए’ प्लॅन यशस्वी झाला नाही तर ‘बी’ तयार ठेवणे आवश्यक. कारण परत मागे फिरून आपण नव्याने विचार करणे शक्य असते, तो दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक असते. अन्यथा, केवळ आपल्या मानसिकतेपोटी आपण आपले भविष्य अधांतरी करून ठेवतो.

लेखक- डॉ. उमेश देवदत्त प्रधान

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी-पालक संवाद २०२२: करिअर निवड आणि विद्यार्थ्यांची मानसिकता
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: करिअर निवड आणि विद्यार्थ्यांची मानसिकता
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: करिअर निवड आणि विद्यार्थ्यांची मानसिकता
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: करिअर निवड आणि विद्यार्थ्यांची मानसिकता
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: करिअर निवड आणि विद्यार्थ्यांची मानसिकता
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: करिअर निवड आणि विद्यार्थ्यांची मानसिकता
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: करिअर निवड आणि विद्यार्थ्यांची मानसिकता
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: करिअर निवड आणि विद्यार्थ्यांची मानसिकता
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: करिअर निवड आणि विद्यार्थ्यांची मानसिकता
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: करिअर निवड आणि विद्यार्थ्यांची मानसिकता
28th November 2023

Career In Railways