Career Guidance

Career Guidance

वाटा करिअरच्या २०२२: व्यवस्थापन क्षेत्रात संधी

PUBLISH DATE 6th July 2022

- डॉ. प्रफुल्ल पवार / डॉ. सुरभी जैन

बदलती अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, नव्याने उपलब्ध होत असलेली उत्पादने आणि बाजारपेठा यामुळे व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सतत काहीतरी नवे घडत असते. नव्या संधी उपलब्ध होत असतात आणि नवी आव्हानेही निर्माण होत असतात. अर्थातच, त्यामुळे व्यवस्थापन शिक्षण हे एक सतत ‘हॅपनिंग’ असे क्षेत्र असतेच. शिवाय त्यातून नोकरी व्यवसायाच्या अनेक संधीही उपलब्ध होत असतात. म्हणूनच देशभरात व्यवस्थापन अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा नेहमी ओढा असतो.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभाग हे व्यवस्थापनशास्त्रातील शिक्षणाचे देशातील एक नावाजलेले केंद्र. ‘एमबीए’ या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त या विभागामध्ये ‘एमबीए फार्मा अँड बायोटेक्नॉलॉजी आणि नोकरीत असलेल्यांसाठी ‘एक्झिक्युटिव्ह एमबीए’ हेही दोन अभ्यासक्रम चालविले जातात. हे तीनही अभ्यासक्रम पदव्युत्तर पातळीवरचे. मात्र, उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रातील तसेच व्यवस्थापन शिक्षणातील नवे बदल लक्षात घेता या विभागाने गेल्या काही वर्षांपासून सेवा क्षेत्रावर (सर्व्हिस सेक्टर) भर देणारा एक पदवी अभ्यासक्रमही सुरु केला. ‘बीबीए- हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट’ अर्थात ‘बीबीए (एचएफएम)’ हे या पदवी अभ्यासक्रमाचे नाव.

बीबीए (एचएफएम) हा एक व्यापक पायावर आधारलेला व्यवस्थापन अभ्यासक्रम आहे. सेवा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे शिक्षण आणि कौशल्ये देण्यावर या अभ्यासक्रमाचा भर आहे.

हा तीन वर्षांचा आणि शैक्षणिक क्रेडीट व्यवस्थेवर (सीबीसीएस) आधारित अभ्यासक्रम आहे. त्यानुसार व्यवस्थापन क्षेत्रातील पायाभूत विषयांसोबतच सेवा (सर्व्हिस) व किरकोळ विक्री (रिटेल) याही क्षेत्रातील विषय इथे शिकविले जातात. व्यवस्थापनाचे पायाभूत ज्ञान व काही क्षेत्रातील विषयनिष्ठ (स्पेशलायझेशन) व्यवस्थापनाचे ज्ञान व कौशल्ये यांचा एक उत्तम मेळ या अभ्यासक्रमामध्ये घातला गेला आहे.

उद्योग क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज ओळखून ‘बीबीए (एचएफएम)’ अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांसाठी अनेक नामवंत सेवा उद्योगांमध्ये उमेदवारी (इंटर्नशिप) करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. फोनिक्स, पॅव्हेलियन, वेस्टएंड, बीव्हीजी, सीएलआर, मॅरिएट, हयात यासारख्या नामवंत कंपन्यांचा त्यात समावेश आहे. कोणत्याही शाखेतून किमान ४५ टक्के (राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत ४० टक्के) गुण मिळवून बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकतो. अर्थात, प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. महाराष्ट्र सरकारचे प्रवेशातील आरक्षणासंबंधीचे सर्व नियम या अभ्यासक्रमाला लागू आहेत.

या अभ्यासक्रमासाठी बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित १०० गुणांची ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील तसेच देशभरातील प्रमुख शहरातील विविध केंद्रामध्ये २१ जुलै २०२२ रोजी ही परीक्षा घेण्यात येईल. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेश अर्जासाठी क्लिक करा- https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx हा अभ्यासक्रम तसेच प्रवेश परीक्षेचा सिलॅबस याबद्दलची अधिक माहिती www.pumba.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. या संदर्भात प्रश्न वा शंका असल्यास pumba.bbahfm@gmail.com या पत्त्यावर मेल करता येईल. विभागाच्या विविध उपक्रमांविषयी माहिती लिंक्डइन, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवरील विभागाच्या पेजवर उपलब्ध आहे.

लेखक --- डॉ. प्रफुल्ल पवार / डॉ. सुरभी जैन

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


वाटा करिअरच्या २०२२: व्यवस्थापन क्षेत्रात संधी
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

वाटा करिअरच्या २०२२: व्यवस्थापन क्षेत्रात संधी
6th February 2024

Career In Fashion Designing

वाटा करिअरच्या २०२२: व्यवस्थापन क्षेत्रात संधी
1st January 2024

AI Trends 2024

वाटा करिअरच्या २०२२: व्यवस्थापन क्षेत्रात संधी
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

वाटा करिअरच्या २०२२: व्यवस्थापन क्षेत्रात संधी
25th December 2023

Skill Development Courses 2024

वाटा करिअरच्या २०२२: व्यवस्थापन क्षेत्रात संधी
25th December 2023

UPSC Free Coaching

वाटा करिअरच्या २०२२: व्यवस्थापन क्षेत्रात संधी
23rd December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: व्यवस्थापन क्षेत्रात संधी
14th December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: व्यवस्थापन क्षेत्रात संधी
8th December 2023

Career Options for Arts Stream

वाटा करिअरच्या २०२२: व्यवस्थापन क्षेत्रात संधी
28th November 2023

Career In Railways