Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: करिअरविषयक अचूक आकलन

PUBLISH DATE 7th June 2022

आपण कोणताही निर्णय घेत असताना माहिती घेत असतो. निर्णयाचा पाया या माहितीतच असतो.

अर्थात, माहितीविना निर्णय घेणे हे देखील शक्य असते, तिथे अंदाज, तर्क आणि जुने अनुभव काही प्रमाणात काम करतात. मात्र, करिअरसारखा आयुष्यावर प्रभाव पाडणारा निर्णय मात्र केवळ अंदाजे आणि तर्कांवर आधारित घेऊ नये. हल्लीचे युग माहितीचा विस्फोट या कालखंडात मोडते. करिअरविषयक माहिती तर चिक्कार आहे. तरीही ती माहिती आपल्या विचारांच्या प्रोसेसरमधून जायला हवी. कुणाच्या उधार सल्ल्यासारखी ती नको.

विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्षेत्रांची उपलब्ध माहिती ग्रहण केली जाणे अपेक्षित आहे. ती माहिती जाणकारांकडून अधोरेखित केली जावी. शंकानिरसन व्हावे. त्या आधी विचारचक्र सुरू व्हावे. काही संभ्रम निर्माण व्हावेत आणि ते दूरही व्हावेत. हे करत असताना करिअर म्हणजे नेमके काय, करिअर निवडीची काही तंत्रे आहेत का, करिअर आणि आयुष्य जगणे यात काही तत्त्वज्ञान आहे का, त्यात आपल्याकडे कोणती कौशल्ये आहेत, माझी आवड-निवड काय, करिअरमधून मला नेमके काय हवे आहे, असे अनेक मुद्दे विचारात घेतले जावेत. या वैयक्तिक जाणीवांसोबत प्रत्येक कार्यक्षेत्रातील कामाचे स्वरूप, जबाबदाऱ्या, आजची आणि उद्याची आव्हाने, त्या कार्यक्षेत्राच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू, आजच्या तारखेला असलेला स्कोप, हे सगळे डोळसपणे समजावून घेतले पाहिजे.

विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्षेत्राचा तुलनात्मक अभ्यास करायला हवा. त्या क्षेत्रांना स्कोप आहे, पण मला तिथे स्कोप आहे का, हे तपासले पाहिजे. कार्यक्षेत्रांच्या आपल्याकडून काय अपेक्षा राहतील याचा अंदाज घ्यायला हवा. देशात आणि परदेशात असलेल्या संधी, बदलते मार्केट, समाजाचा बदलता विचारप्रवाह यांसाठी सुयोग्य करिअर कोणते, हा विचार जाणकारांकडून समजावून घ्यावा. अर्थातच, अपुरी माहिती न घेता. अर्धवट माहिती पक्की दृष्टी देणार नाही, तर चुकीची माहिती चुकीचा निर्णय देईल. करिअर विषयक सर्व सामान्य माणसाला काहीच माहिती नसते असे नाही आणि सगळे माहीत असते, असेही नाही. समस्या अशी आहे की, जेव्हा मोजक्याच करिअर्सची माहिती आपणास असते, तेव्हा विचारांच्या परिघात मोजकेच मुद्दे येतात. कदाचित आपल्याला एकदम शोभेल असे करिअर क्षेत्र विचारांच्या सीमारेषेपलीकडे राहते. आयुष्याच्या कुठल्याशा टप्प्यात याचा पश्चात्ताप होऊ शकतो. करिअरची अपुरी माहिती महत्त्वाच्या संधीपासून आपल्याला दूर ठेवू शकतात. समोर जे आहे ते सगळे दिसले पाहिजे. निर्णय प्रक्रियेसाठी हे गरजेचे आहे. तेव्हा विद्यार्थी आणि पालकांनी जास्तीत जास्त माहिती विविध कर्यक्षेत्रांबद्दल घ्यावी. ही माहिती योग्य ठिकाणावरून घ्यावी. जेवढे दिसते तेवढेच विश्व, ही भावना नको. नुसतीच ॲप्टिट्यूड टेस्ट करून सगळे साध्य होणार नाही.

करिअरमधील सध्याचे वास्तव समजावून घ्यायलाच हवे. यासाठी वेळ द्यावा. नव्या पिढीला हवेहवेसे नवे आयाम सहज लक्षात यावेत यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत. पालकांनीही वेळ काढून जास्तीत जास्त माहिती गोळी करावी. सकस माहिती घ्यावी आणि मग अत्यंत आनंदाने आपल्याला आवडेल तो निर्णय घ्यावा. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांइतकाच समाजाचाही फायदा आहे. यातून काही ठराविकच क्षेत्रांमध्ये विनाकारण गर्दी होणार नाही आणि काही महत्त्वाच्या पण अनोळखी क्षेत्रांकडे कुणीच फिरकत नाही, असे होणार नाही. याचा थेट संबंध सुशिक्षित बेरोजगारी कमी होण्याकडेही होईल, तसेच नवीन कार्यक्षेत्रे उदयास येऊन रोजगाराची नवी दालने उघडण्यात देखील मदत होईल.

लेखक - प्रा. विजय नवले

(लेखक करिअर मार्गदर्शक आहेत.)

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी-पालक संवाद २०२२:  करिअरविषयक अचूक आकलन
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२:  करिअरविषयक अचूक आकलन
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी-पालक संवाद २०२२:  करिअरविषयक अचूक आकलन
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२:  करिअरविषयक अचूक आकलन
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी-पालक संवाद २०२२:  करिअरविषयक अचूक आकलन
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२:  करिअरविषयक अचूक आकलन
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी-पालक संवाद २०२२:  करिअरविषयक अचूक आकलन
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२:  करिअरविषयक अचूक आकलन
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२:  करिअरविषयक अचूक आकलन
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी-पालक संवाद २०२२:  करिअरविषयक अचूक आकलन
28th November 2023

Career In Railways