Career Guidance

Career Guidance

वाटा करिअरच्या २०२२: प्रॉडक्ट डिझाईनमधील वेगळेपण

PUBLISH DATE 18th June 2022

औद्योगिक तंत्रज्ञान आणि त्या आधारे उत्पादित झालेले पदार्थ किंवा वस्तू हे घटक आधुनिक अर्थव्यवस्थेत निर्णयात्मक भूमिका बजावतात.

उत्पादनाची रचना किंवा डिझाईन हे दोन कार्यावर अवलंबून असते. पहिले प्रॉडक्ट डिझाईन आणि नंतर प्रोसेस डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन कार्यात प्रॉडक्टचे आकारमान, ताकद व इतर बाबी अभियांत्रिकी डिझाईन शास्त्रानुसार ठरविल्या जातात. त्याचबरोबर डिझाईन झालेला प्रॉडक्ट हा अपेक्षित कार्य सुरळीत व व्यवस्थित करेल का नाही, प्रॉडक्ट डिझाईनमध्ये कटाक्षाने पाळल्या जातात. यानंतरचा टप्पा येतो तो प्रोसेस डिझाईनचा. यामध्ये डिझाईन केलेला प्रॉडक्ट व्यवहार्यदृष्टीने अगदी स्पर्धात्मक खर्चात कसा उत्पादित करता येईल, याचा सर्वांगीण दृष्टीने विचार होतो व त्यानुसार प्रोसेस डिझाईन अंतिम होते. दिलेल्या वेळेत, कमीत कमी खर्चात व योग्य त्या उत्पादन प्रक्रियांचा व्यवस्थित अवलंब करून उत्पादन प्रक्रियेची रचना म्हणजे प्रोसेस डिझाईन म्हणता येईल. या डिझाईनमध्ये उत्पादन प्रक्रियांच्या क्रमाला महत्त्व असते. उत्पादन प्रक्रियांचा क्रम हा उत्पादन कार्यक्षम व प्रभावी आहे की नाही, हे ठरवीत असतो.

उत्पादन अर्थकारण हे अतिशय काळजीपूर्वक सांभाळावे लागते. उत्पादन उद्योगांना अपेक्षित प्रॉडक्टनुसार प्रोसेस डिझाईनची आवश्यकता भासते. कमीतकमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पादकता, हे तत्त्व उत्पादन उद्योगांना पाळावे लागते. नवीन वस्तुनिर्मिती किंवा उत्पादन हे क्षेत्र अतिशय विस्तृत व सर्वव्यापी असल्याने यातील संधी व आव्हाने जागतिक स्पर्धेमुळे वाढत आहेत. इंजिनिअरिंग प्रॉडक्ट डेव्हलपमेंट व डिझाईनमधील कॉम्प्युटर सॉफ्टवेअर पॅकेजच्या वापराने या क्षेत्रात मोठे क्रांतिकारक बदल झाले. विविध कंपन्यांचे वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी असंख्य प्रॉडक्ट बाजारात स्पर्धा करताहेत. औद्योगिक आणि बिगर औद्योगिक प्रॉडक्ट उत्पादन उद्योगांचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे. डिझाईन विषयातील प्रशिक्षित व उच्चशिक्षित मनुष्यबळाला महत्त्व प्राप्त झाले.

ही गरज ओळखून तंत्रशिक्षणात डिझाईन या विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली. सरकारी/खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये गेट (GATE) परीक्षेतील स्कोअर आधारे डिझाईन विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश मिळतो. यासाठी अभियांत्रिकी पदवीधारक पात्र ठरतात. या व्यतिरिक्त भारतीय प्रौद्योगिक संस्थांनी (आयआयटी) डिझाईन विषयाचे स्वतंत्र व विशेष पदव्युत्तर (एम. डिझाईन) अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मुंबई, दिल्ली व कानपूर आयआयटी तसेच आयआयएस्सी बंगळूर या संस्थांमध्ये एम डिझाईन या पदव्युत्तर अभ्यासक्रमात अखिल भारतीय स्तरावर दरवर्षी घेण्यात येणाऱ्या डिझाईन सामाईक प्रवेश परीक्षाद्वारे (CEED) प्रवेश मिळतो.

या प्रवेश परीक्षांमार्फत उमेदवारांचे डिझाईन विषयासंबंधी ॲटिट्यूड, ड्रॉइंग कौशल्य, कल्पनाशक्ती आदी गुण तपासले जातात. या परीक्षेत नुसते उत्तीर्ण होऊनही चालत नाही. त्याचबरोबर त्या-त्या आयआयटी/आयआयएस्सी येथील स्वतंत्र चाचणी व मुलाखत यांना सामोरे जावे लागते. अभ्यासक्रम विशेष असल्याने उमेदवारांना रोजगाराची हमी निश्चित असते. इंडस्ट्रिअल डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन, अॅनिमेशन, इंटर अॅक्शन डिझाईन आदी विषयांचे या अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षण मिळते.

डिझाईन सामाईक प्रवेश परीक्षेसाठी पुढील शिक्षण उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार पात्र ठरतात.

  • इंजिनिअरिंग/आर्किटेक्चर/डिझाईन/इंटिरिअर डिझाईन अभ्यासक्रमातील पदवी शिक्षण.

  • डिझाईनमधील पदविका शिक्षण (एनआयडी/सीईपीटी किंवा समतुल्य)

  • बारावीनंतर पाच वर्षांचा जीडी आर्ट व नंतर एक वर्षांचा कार्यानुभव

  • आर्ट्स/सायन्स/कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमधील पदव्युत्तर शिक्षण (Msc)

डिझाईन सामाईक प्रवेश परीक्षा व संबंधित माहिती आयआयटी, मुंबईच्या www.idc.iitb.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच आयआयटी दिल्ली/कानपूर व आयआयएस्सी, बंगळूर यांच्या वैयक्तिक संकेतस्थळांवरही माहिती मिळते. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट हा प्रत्येक उद्योगाचा आत्मा असतो. त्यामुळे सातत्याने बदलणाऱ्या तीव्र स्पर्धेच्या बाजारपेठेत नवीन वस्तूच्या डिझाईन व निर्मितीकडे सर्व उद्योजकांना मुख्य लक्ष केंद्रित करावे लागते. प्रत्येक उद्योग हा त्याने उत्पादित केलेल्या प्रॉडक्टवरून ओळखला जातो. डिझाईन-बिल्ड-टेस्ट या इंजिनिअरिंग तत्त्वाधारे बहुतांश सर्व प्रॉडक्टची निर्मिती होते. बाजारपेठेतील स्पर्धा, मागणी व बदलणारे तंत्रज्ञान यांची योग्यरीत्या सांगड घालून नवीन प्रॉडक्टच्या निर्मितीचे आव्हान तंत्रज्ञ, रचनाकार व शास्त्रज्ञ यांना द्यावे लागते.

लेखक - राजेश ओहोळ

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


वाटा करिअरच्या २०२२: प्रॉडक्ट डिझाईनमधील वेगळेपण
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

वाटा करिअरच्या २०२२: प्रॉडक्ट डिझाईनमधील वेगळेपण
6th February 2024

Career In Fashion Designing

वाटा करिअरच्या २०२२: प्रॉडक्ट डिझाईनमधील वेगळेपण
1st January 2024

AI Trends 2024

वाटा करिअरच्या २०२२: प्रॉडक्ट डिझाईनमधील वेगळेपण
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

वाटा करिअरच्या २०२२: प्रॉडक्ट डिझाईनमधील वेगळेपण
25th December 2023

Skill Development Courses 2024

वाटा करिअरच्या २०२२: प्रॉडक्ट डिझाईनमधील वेगळेपण
25th December 2023

UPSC Free Coaching

वाटा करिअरच्या २०२२: प्रॉडक्ट डिझाईनमधील वेगळेपण
23rd December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: प्रॉडक्ट डिझाईनमधील वेगळेपण
14th December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: प्रॉडक्ट डिझाईनमधील वेगळेपण
8th December 2023

Career Options for Arts Stream

वाटा करिअरच्या २०२२: प्रॉडक्ट डिझाईनमधील वेगळेपण
28th November 2023

Career In Railways