Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: निर्णय घेण्यापूर्वी असा हवा पडताळा

PUBLISH DATE 11th June 2022

करिअर, शाखा, संस्था निवड करताना ज्या मुद्यांचा विचार करायचा त्यांची एक पडताळा सूची करून त्याआधारे आपल्या निर्णयाची परीक्षा आपणच घेतली तर आपल्याला निर्णय घेण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन नक्की लाभेल.

अमुक एक मुद्दा लक्षातच घेतला गेला नाही असे होणार नाही. आपला निर्णय समाधानकारकच असेल, आत्ता आणि भविष्यातही शांतपणे आणि काही निकषांवर आधारित विचार करणं आवश्यक आहे. अंधपणे केलेली कोणतीही निवड ही धोकादायकच. स्वतःचे प्रतिसाद काय आहेत हे पहा आणि निर्णयाकडे वळा. आत्मपरिक्षणाचे हे मुद्दे तुम्हाला नक्कीच दिशा दर्शवतील. काही नमुना प्रश्न विद्यार्थ्यांसाठी आणि काही पालकांसाठी.

विद्यार्थ्यांसाठी पडताळा सूची...

  • मी निवड केलेल्या शाखेत, करिअरमध्ये, कॉलेजमध्ये माझी आवड आहे ना?

  • केलेली निवड माझी आहे ना? मी कुणाच्या दबावाखाली निर्णय घेत नाहीए ना?

  • निवडलेल्या शाखेमधील, करिअरमधील फायदे आणि तोटे यांचा विचार केला आहे ना?

  • या शाखेसाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीचा, कष्टांचा मी परिचय करून घेतला आहे का?

  • जमले नाही तर माझा दुसरा पर्याय कोणता असणार आहे?

  • पुढे जाऊन मला या शाखेत, करिअरमध्ये काय करता येण्याजोगे आहे याचा मी शोध घेतला आहे का?

  • या शाखेत, करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी कितपत आहे?

  • या शाखेची, करिअरची निवड केलेल्या काही जणांशी तरी मी संवाद साधला आहे का?

  • या शाखेमध्ये, करिअरमध्ये निवड झाल्यानंतर मिळणाऱ्या मोबदल्यात मी समाधानी असणार ना?

  • निर्णय घेण्यात माझे कुटुंबीय समाधानी आणि सहाय्यक ठरतील का?

  • माझ्यासमोर काम करण्याबाबत मी कुणाचा आदर्श ठेवला आहे का?

  • या शाखेत अभ्यास करणाऱ्या किंवा या करिअरमध्ये काम करणाऱ्याशी माझे बोलणे झालेले आहे का?

  • मला निवडायच्या शाखेबाबत, करिअरबाबत माझी पार्श्वभूमी काय आहे?

  • या शाखेकडे, करिअरकडे मी का आकर्षित झालो आहे?

 

पालकांसाठी पडताळा सूची...

  • निवड करताना मी पाल्यावर दबाव तर टाकत नाहीए ना?

  • पाल्य निवडत असलेल्या शाखेचा खर्च मला परवडणार आहे ना?

  • पाल्याने जाणूनबुजून या शाखेची, करिअरची निवड केली असल्याची मी खात्री करून घेतली आहे ना?

  • पाल्याच्या निर्णयात, निवडीत मी लुडबूड करत नाहिए ना?

  • पाल्याला भविष्यात गरज भासल्यास या करिअरबाबत मी मदत, मार्गदर्शन करू शकेन का?

  • या शाखेबाबत, करिअरबाबत पूर्ण माहिती पाल्याने मिळवली आहे असे वाटते का?

  • माहिती मिळवण्याचे स्रोत पक्के आहेत का याची खात्री केली का?

  • पाल्याच्या निर्णयाबाबत आम्ही खूष, समाधानी आहोत का?

  • पाल्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल याचा विचार केला आहे का?

  • आवश्यक ते संदर्भ साहित्य आम्ही उपलब्ध करून देऊ शकू का?

  • पाल्याला स्वयंपूर्ण होण्यासाठी काही जबाबदारी आम्ही त्याच्यावर टाकायला सुरुवात केली आहे का?

  • पाल्य आपल्यापासून काही गोष्टी लपवून ठेवत तर नाही ना याची खात्री केली आहे का?

हे आणि यासारखे अनेक प्रश्न तुमच्या मनात उमटले पाहिजेत व ज्याची समाधानकारक उत्तरे तुम्ही मिळवू शकला पाहिजेत. तरंच हा करिअर निवडीचा टप्पा तुम्ही आणि तुमचा पाल्य यशस्वीपणे पार पाडू शकाल

लेखक - डॉ. उमेश प्रधान udpradhan@gmail.com.

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी-पालक संवाद २०२२: निर्णय घेण्यापूर्वी असा हवा पडताळा
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: निर्णय घेण्यापूर्वी असा हवा पडताळा
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: निर्णय घेण्यापूर्वी असा हवा पडताळा
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: निर्णय घेण्यापूर्वी असा हवा पडताळा
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: निर्णय घेण्यापूर्वी असा हवा पडताळा
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: निर्णय घेण्यापूर्वी असा हवा पडताळा
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: निर्णय घेण्यापूर्वी असा हवा पडताळा
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: निर्णय घेण्यापूर्वी असा हवा पडताळा
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: निर्णय घेण्यापूर्वी असा हवा पडताळा
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: निर्णय घेण्यापूर्वी असा हवा पडताळा
28th November 2023

Career In Railways