Schools

Schools

मुंबई महापालिकाच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेची ३० एप्रिलला सोडत

PUBLISH DATE 27th April 2020

महापालिका हद्दीत असणाऱ्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी मुंबई महापालिकेने सीबीएसई आणि आयसीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळांसाठी दोन हजार ४९७ अर्ज प्राप्त झाले आहेत.

या शाळांच्या प्रवेशासाठी ३० एप्रिल रोजी ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी दोन विद्यार्थी आणि पालकांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे.

सीबीएसई बोर्डाची शाळा पालिकेच्या अंधेरी पूर्वेकडील पूनम नगर मनपा शाळेत; तर आयसीएसई बोर्डाची शाळा माटुंगा पश्‍चिमेकडील वूलन मिल मनपा शाळेमध्ये सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही बोर्डांच्या शाळा या सध्या प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. त्यानुसार या दोन्ही शाळांमध्ये ज्युनियर, सीनियर केजी, पहिली ते सहावीचे वर्ग २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येणार आहेत. या शाळांच्या प्रवेशाची प्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. प्रवेशासाठी पालकांनी १२ मार्चपर्यंत अर्ज केले असून सीबीएसईच्या प्रवेशासाठी दोन हजार १५४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. तसेच, आयसीएसई शाळेसाठी ३४३ अर्ज आले आहेत. चालू शैक्षणिक वर्षासाठी दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू केले जातील. इयत्ता तिसरी ते सहावीच्या वर्गात किमान १० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास तिसरी ते सहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. ज्या इयत्तेत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची संख्या ३८ पेक्षा अधिक असेल त्याच वर्गाची सोडत काढण्यात येणार आहे. २७ एप्रिलला विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून १० मे पर्यंत गुगलमार्फत अर्ज भरून घेण्यात येणार आहे.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


मुंबई महापालिकाच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेची ३० एप्रिलला सोडत
30th January 2024

MPSOS Result 2023

मुंबई महापालिकाच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेची ३० एप्रिलला सोडत
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

मुंबई महापालिकाच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेची ३० एप्रिलला सोडत
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

मुंबई महापालिकाच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेची ३० एप्रिलला सोडत
27th December 2023

NIOS Result 2023 Out

मुंबई महापालिकाच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेची ३० एप्रिलला सोडत
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

मुंबई महापालिकाच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेची ३० एप्रिलला सोडत
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

मुंबई महापालिकाच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेची ३० एप्रिलला सोडत
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

मुंबई महापालिकाच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेची ३० एप्रिलला सोडत
22nd June 2023

JNVST Result 2023