Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: योग्यता आणि कल चाचणी

PUBLISH DATE 16th June 2022

आपल्या पाल्याचा कल कोणत्या शाखेच्या किंवा करिअरकडे आहे हे आणि त्यासाठी तो योग्य आहे का, हे समजून घेण्यासाठी ही एक चाचपणी करण्याची पद्धती आहे.

आवड कशात आहे, त्याला आनंद कशात मिळणार आहे, कोणत्या व्यवसायात, नोकरीत आपला पाल्य यशस्वी होण्याची शक्यता आहे का हे समजून घेण्याकरीता एखादी चाचणी देऊन तपासता येणे शक्य आहे का? नेमके हेच काम शास्त्रीय पद्धतीने करण्याकडे सध्या कल आहे.

कल चाचणीची साधारण उद्दिष्टे

  • आपण काय करू शकता आणि काय करणे आपल्याला जमेल आणि आवडेल ते जाणून घेणे.

  • शालान्त परीक्षेस प्रविष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवसाय मार्गदर्शन सेवेद्वारे शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यास मार्गदर्शन करणे. 

  • विद्यार्थी व पालक यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची माहिती देऊन जाणीव जागृती करणे.

  • बौद्धिक आणि मानसिक चाचणीतून विद्यार्थ्याच्या भविष्यातील संभाव्य नोकरी, व्यवसाय याविषयी समुपदेशन करणे.

कल चाचणीची निर्मिती

अनेक संस्थांकडून कल चाचणीची निर्मिती करण्यात आलेली आहे. मानसशास्त्रीय शोधनातून आपली आवड कोणत्या व्यवसायात, नोकरीत आहे, कोणत्या विद्या शाखेकडे आहे याचे विश्लेषण या चाचणीमधून करण्यात येते. मात्र, अशा चाचण्यांमधून विचारले जाणारे प्रश्न किंवा कृती या अप्रत्यक्ष असणे गरजेचे असते. प्रत्यक्ष प्रश्न न विचारता अनभिज्ञपणे कल, अभिरुची जाणून घेणे महत्त्वाचे आहे. राज्य शिक्षण संशोधन परिषदेमध्ये याविषयीचा एक स्वतंत्र विभाग असून, वर्षभर अशा चाचण्या आयोजित करून विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्यातील क्षेत्राविषयी जाणीव जागृती केली जाते. अशा चाचण्यांमधून दिले जाणारे परिणाम महत्त्वाचे असतात आणि त्यावरून आपली अभिरुची ओळखून कोणती शाखा निवडावी, कोणत्या व्यवसायाकडे वळावे हे ठरवता येऊ शकते. काही व्यावसायिक समुपदेशक सुद्धा अशा प्रकारच्या चाचण्या आयोजित करून त्याआधारे आपण निवड करावी अशा क्षेत्रांविषयी मार्गदर्शन मिळू शकते. शालेय स्तरावर विविध शाळांमार्फत अशा कल चाचण्या घेण्यात येतात त्यातूनपण आपण आपले भवितव्य शोधू शकतो.

स्वतःचा शोध

आपल्या स्वतःला ओळखणं ही एक आव्हानात्मक गोष्ट असते. आपणच आपल्याला किती समजले आहे, हे पाहिले जात नाही आणि इतरांनी आपल्याविषयी केलेल्या मताला अनुसरून आपण निर्णय घेतो, जे भविष्यात आपल्याला कदाचित सुखी ठेऊ शकत नाहीत. आपल्यातील बलस्थाने काय आहेत, हे ओळखले पाहिजे. तसेच आपण कोणत्या क्षेत्रात मागे पडतो, नावडतीचा काम कोणतं हे जाणून घेतले म्हणजे, मग कोणतीही निवड करणे सोपे होते. तसे आत्मशोध हा जीवनभरातील प्रवासाचाच एक अविभाज्य भागच!

बौद्धिक कौशल्य आणि क्षमतांची चाचणी निर्मिती आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाचे विश्लेषण व त्या आधारे मिळणारे निष्कर्ष आणि त्यावरून पालकांनी आणि पाल्यांनी घ्यायचा निर्णय ही प्रक्रिया अजूनही आपल्याकडे म्हणावी इतकी सर्वमान्य नाही. या चाचण्या उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशा स्वरूपाच्या नसतात, तर केवळ सूचित करणाऱ्या असतात. अशा चाचण्यांतून तुमची बुद्धिमत्ता, मानसिकता, अभिरुची, कौशल्य, क्षमता, निर्णयक्षमता इत्यादी तपासणारे प्रश्न असतात. त्यांना आपण दिलेल्या परिणामांवर आधारित काही निष्कर्ष मांडले जातात जे आपल्याला निर्णय घ्यायला मार्गदर्शन करतात.

मानसिक कल आणि अभिरुची तपासणी ही शास्त्रीय पद्धतीने होत असते. परंतु, त्याला असणारा मानवी मनाचा कंगोराही तितकाच महत्त्वाचा. अनेक वेळा निष्कर्ष आणि अंमलबजावणी यात अंतर पडते आणि आपले नशीब आपण वेगळेच घडवतो, असाही अनुभव येतो. आपल्यात असणारे नऊ प्रकारच्या विविध बुद्धिमत्ता यास कारणीभूत ठरतात. तसेच, याबाबत आपल्याला म्हणून कल चाचणी आणि त्यावरील निष्कर्ष हे एक सूचित करणारे आहेत ते काही अंतिम किंवा निर्णायक नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. जो निर्णय घ्याल त्याला अनुसरून कष्ट करायला सुरुवात केली पाहिजे. कारण कष्टाला पर्याय नाही.

लेखक - डॉ. उमेश प्रधान udpradhan@gmail.com

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी-पालक संवाद २०२२: योग्यता आणि कल चाचणी
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: योग्यता आणि कल चाचणी
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: योग्यता आणि कल चाचणी
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: योग्यता आणि कल चाचणी
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: योग्यता आणि कल चाचणी
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: योग्यता आणि कल चाचणी
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: योग्यता आणि कल चाचणी
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: योग्यता आणि कल चाचणी
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: योग्यता आणि कल चाचणी
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: योग्यता आणि कल चाचणी
28th November 2023

Career In Railways