Medical Admissions 2020-21

Medical Admissions 2020-21

MHT-CET, JEE, NEET परीक्षेच्या सरावासाठी मॉक सीईटी

PUBLISH DATE 4th April 2018

बारावीनंतर इंजिनीअरिंग किंवा मेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांची तयारी करणे सोपे जावे, यासाठी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑफलाइन व ऑनलाइन स्वरूपात राज्यभरात ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

आमदार प्रा. मेधा कुलकर्णी व विद्यार्थी मित्र यांच्यातर्फे या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे, याबाबतची माहिती विद्यार्थी मित्र डॉट ओआरजीचे संस्थापक के. रवींद्र यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षीही या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीची ऑफलाइन परीक्षा २९ एप्रिल रोजी होणार आहे. तर ऑनलाइन परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार असून मुख्य परीक्षा होईपर्यंत ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून अल्प  शुल्क आकारण्यात येणार आहे. यामध्ये एक ऑफलाइन व एक ऑनलाइन परीक्षा देता येईल.

या सराव परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीचा अंदाज येऊ शकेल. तसेच त्यांच्यावरील ताणही कमी होईल. या सराव परीक्षेचे पेपर आयआयटी, एनआयटीच्या तज्ज्ञ प्राध्यापक व डॉक्टर्सकडून तयार केले जाणार असून त्याचे मूल्यमापनही केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील कामगिरी त्यांना मूल्यमापनाद्वारे समजणार आहे. विद्यार्थ्यांना मिळालेले गुण तसेच त्यांचा जिल्हावार व राज्यस्तरावर कितवा क्रमांक आला आहे, हे देखील त्यांना समजणार आहे. त्यामुळे त्यांना आपल्या अभ्यासात आवश्यक ती सुधारणा करणे शक्य होईल, अशी माहिती रवींद्र यांनी दिली.

नाव नोंदणी करिता | CET, JEE, NEET Mock Exam | येथे क्लिक करा 

'या परीक्षेसाठी ११०० विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी एक हजार विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली होती. त्यांना मुख्य प्रवेश परीक्षा देताना या सराव परीक्षेचा फायदा झाला होता,' असा दावा के. रवींद्र यांनी केला. 'सीईटी, जेईई, नीटसारख्या प्रवेश परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या व त्याद्वारे चांगल्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवून करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तयारीच्या दृष्टीने ही सराव परीक्षा अत्यंत फायद्याची आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यावी,' असे आवाहन प्रा. मेधा कुलकर्णी यांनी केले.

नाव नोंदणी करिता | CET, JEE, NEET Mock Exam | येथे क्लिक करा.

मुख्य MHT-CET, JEE, NEET परिक्षेच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणारी सर्वात मोठी  Mock MHT-CET, JEE, NEET, त्याचबरोबर लवकरच “विद्यार्थी मित्र” NDA, Banking, SSC, रेल्वे भरती इ. Mock Exams (सराव परिक्षा) घेत आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी Mock Exam (सराव परिक्षा) परिक्षेचा लाभ घ्यावा.

परिक्षेची मुख्य वैशिष्टे :

  • IIT, NIT तज्ज्ञ शिक्षक व डॉक्टरर्सकडून पेपर सेट व मार्गदर्शन.

  • ऑफलाइन (पेन व पेपर) परीक्षे सोबत एक ऑनलाइन परीक्षा मोफत असणार आहे.

  • Subject & Chapterwise practice test with explanations

  • मुख्य परीक्षेच्या वातावरणात Mock Exam (सराव परिक्षा) झाल्याने, मार्क्स वाढविण्यासाठी प्रयत्न करता येईल व अधिक चांगले कॉलेज मिळवता येईल. उदा. VJTI/ICT-Mumbai, COEP-Pune.

  • Mock exam (सराव परिक्षा) देणाऱ्या इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थाचा अभ्यास किती व कसा झाला हे पाहण्यासाठी ही परिक्षा गरजेची आहे.

  • Subject wise & Chapter wise questions with solutions.

  • इंजिनीरिंग, मेडिकल व DTE च्या इतर सर्व कोर्सेस चा मागील वर्षाचा cut-offs एका क्लिक वर उपलब्ध.

  • State-wise, District-wise Ranks.

  • इंजिनीरिंग, मेडिकल व DTE च्या इतर सर्व कोर्सेस अॅडमिशनसाठी WhatsApp द्वारे मार्गदर्शन यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी Mock Exams (सराव परिक्षा) परीक्षेचा लाभ घ्यावा.

Read More | NEET UG

Click here Details of All  : Entrance Exams 2018