Schools

Schools

शाळा, कॉलेज, मोबाईल कंपन्या 'आधार' मागू शकत नाहीत: सुप्रीम कोर्ट

PUBLISH DATE 26th September 2018

आधार कार्ड घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिला आहे. आधारमुळे वैयक्तिक गोपनीयतेवर घाला येत नसून कोणतीही खासगी संस्था नागरिकांकडून आधारकार्ड मागू शकत नाही. याशिवाय, शाळा आणि महाविद्यालयंही आधारसक्ती करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल कोर्टानं दिला आहे. 

'आधार'च्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात न्यायाधीश ए.के.सिकरी यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. 

आधार ही सामान्य नागरिकाची ओळख आहे. आधारकार्डाचं डुप्लिकेट बनवता येत नाही. आधार घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचं सांगतानाच लोकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने कायदा करायला हवा, असं कोर्टाने नमूद केलं आहे. 

आधार अॅक्टमधील ३३(२) हे कलम मात्र रद्द केले आहे. या कलमानुसार नागरिकांच्या प्रमाणीकरणाची माहिती (ऑथेंटिकेशन डेटा) पाच वर्षांपर्यंत साठवून ठेवण्याची तरतूद होती. जी सुप्रीम कोर्टाने रद्द करून केवळ सहा महिनेच ही माहिती साठवता येईल, असा आदेश न्या. सिकरी यांनी दिला आहे. 

'आधार'वरील निर्णयावर काय म्हणालं सुप्रीम कोर्ट... 

>> सीबीएसई, नीट आणि यूजीसी परीक्षांसाठी आधारसक्ती नाही. 

>> घुसखोरांना आधारकार्ड मिळणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी. 

>> पॅनकार्ड लिंक करण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य. 

>> आधार कायद्यातील कलम ५७ अवैध. कोणत्याही खासगी कंपनीला आधारकार्ड मागता येणार नाही. 

>> बँक खात्याला आधार लिंक करण्याची गरज नाही. 

>> शाळा, कॉलेजमधील प्रवेशासाठी आधारसक्ती नाही. 

>> सिमकार्डसाठी आधार कार्डची गरज नाही. 

>> आधार ही सर्वसामान्य नागरिकाची ओळख. आधारमुळे देशातील गरिबांना ताकद मिळाली. 

>> आधार पूर्णपणे सुरक्षीत. 

Upcoming Entrance Exams Details  2018-19

JEE MAIN 2019

CAT

Exam date:25 Nov 2018

Last date of Application: 19 Sept 2018

https://goo.gl/A625Sk

 

MAT

Exam date: 02 Sept 2018

Last date of Application: 24 Aug, 2018,

https://goo.gl/xhja4j

 

GATE

Exam date: 02nd Feb 2019

Last date of Application: 21st Sept 2018

https://goo.gl/r4BX1g

 

SIAC-CET

Exam date: 4 Nov 2018

Last date of Application: 14 Sept 2018

https://goo.gl/gr3fLV

 

CDS

Exam date:18 Nov 2018

Last date of Application: 3 Sept 2018

https://goo.gl/s4BsfE

 

NSTSE

Exam date:16 Dec 2018

Last date of Application:1 Aug 2018

https://goo.gl/SDCYMy

 

XAT

Management

Exam date:6 Jane 2019

Last date of Application: 30 Nov 2018

https://goo.gl/Jz2Gyb

 

JEE MAIN

Engineering

Exam date:6 Jan 2018

Last date of Application:30 Sept 2019

https://goo.gl/gBdyF8

 

CTET