RTE Admissions

RTE Admissions

‘आरटीई’ची दुसरी फेरी जाहीर

PUBLISH DATE 12th June 2018

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सोमवारी जाहीर झाली असून, त्यात पाच हजार २७३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहे. पालकांना या विद्यार्थ्यांचे प्रवेश १६ जूनपर्यत घ्यायचे आहे, असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत अनेक जिल्ह्यांमध्ये प्रवेशाची दुसरी फेरी पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यत ५१ हजार ६४३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. पुणे जिल्ह्यात ९३० शाळांमध्ये १६ हजार ३०६ जागा राखीव आहेत. त्यापैकी ७ हजार ५९४ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. मात्र, पुणे आणि बोटावर मोजण्याइतक्या काही जिल्ह्यांमध्ये 'आरटीई'ची प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर झालेली नव्हती. त्यामुळे पालकांमध्ये मुलांच्या प्रवेशाबाबत अस्वस्थता होती. दुसरी फेरी कधी जाहीर होणार आहे, याबाबत कोणत्याच प्रकारची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेली नसल्याने पालकांना शिक्षण विभागाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. या प्रकाराबाबत आम आदमी पालक युनियन, आरटीई प्रवेश कृती समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने वारंवार पाठपुरावा केला होते. अखेर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पुणे जिल्ह्यातील ९३० शाळांमधील राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सोमवारी जाहीर केली आहे.

प्रवेशफेरीबाबत महत्त्वाचे

- दुसऱ्या प्रवेश फेरीत नाव असणाऱ्या मुलांना येत्या १६ जूनपर्यत शाळेमध्ये आवश्यक कादगपत्रांसोबत जाऊन संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करायचे आहेत.

- तांत्रिक अडचणींमुळे पालकांना मेसेज पाठविण्यात येणार नाहीत.

- पालकांनी https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या वेबसाइटवर जाऊन आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश फेरीत नाव आहे की नाही याची माहिती घ्यायची आहे.

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org/

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------