DTE Admissions 2019-20

DTE Admissions 2019-20

बी-फार्म, फार्म-डीसाठी ऑनलाइन अर्ज आजपासून

PUBLISH DATE 11th June 2018

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्यातील कॉलेजांमध्ये बी-फार्म आणि फार्म-डी या पदवी अभ्य़ासक्रमांना येत्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया जाहीर केली असून, विद्यार्थ्यांना आज, सोमवारी ११ जूनपासून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज १९ जूनपर्यंत भरता येणार असून, प्रवेशाची पहिली प्राथमिक गुणवत्ता यादी २० जूनला प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती सीईटी सेलतर्फे देण्यात आली आहे.

बी-फार्म आणि फार्म-डी अभ्य़ासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी झालेल्या एमएचटी सीईटी आणि नीट प्रवेश परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांमध्ये नॉन-झिरो गुण असणे आवश्यक आहे. तर, बारावीत पीसीबी गटात सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के गुण; तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करायची आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना ११ ते १९ जून दरम्यान ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. तर, १२ ते १९ जून या कालावधीत जवळच्या फॅसिलिटेशन सेंटरवर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून कर्न्फर्मेशन करायचे आहे. ही प्रकिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेशासाठी आवश्यक असणारी पहिली प्राथमिक गुणवत्ता यादी २० जून रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. या यादीबाबत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवायचे असल्यास २१ आणि २२ जून रोजी नोंदवावेत. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी असणाऱ्या रिक्त जागांची माहिती २३ जून रोजी जाहीर करण्यात येतील. या जागांनुसार विद्यार्थ्यांना २४ ते २७ जून या कालावधीत कॉलेजांचे प्राधान्य क्रम भरता येईल. प्रवेशाची पहिली यादी २८ जून रोजी जाहीर करण्यात येणार असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना एआरसी सेंटरवर जाऊन २९ जून ते २ जुलै या कालावधीत प्रवेश निश्चित करायचे आहेत. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना https://ph2018.mahacet.org/staticpages/homepage.aspx या वेबसाइटवर मिळेल, असे सीईटी सेलने सांगितले आहे.

प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक

प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करुन अर्ज भरणे - ११ ते १९ जून

कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जाचे कन्फर्मेशन - १२ ते १९ जून

प्राथमिक गुणवत्ता यादी - २० जून

गुणवत्ता यादीवर आक्षेप - २१ आणि २२ जून

अंतिम गुणवत्ता यादी - २३ जून

रिक्त जागांची माहिती - २३ जून

कॉलेजांचे प्राधान्य क्रम भरणे - २४ ते २७ जून

प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करणे - २८ जून

गुणवत्ता यादीनुसार प्रवेश करणे - २९ जून ते २ जुलै

दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर - ३ जुलै

कॉलेजांचे प्राधान्य क्रम भरणे - ४ ते ६ जुलै

प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करणे - ७ जुलै

गुणवत्ता यादीनुसार प्रवेश करणे - ८ ते १० जुलै

तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर - ११ जुलै

कॉलेजांचे प्राधान्य क्रम भरणे - १२ ते १४ जुलै

प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करणे - १५ जुलै


गुणवत्ता यादीनुसार प्रवेश करणे - १६ ते १८ जुलै

कॉलेजात जाऊन शुल्क भरून प्रवेश घेणे - २९ जून ते २० जुलै

रिक्त जागा जाहीर करणे - २ ऑगस्ट

कॉलेजांचे प्राधान्य क्रम भरणे - ३ ते ५ ऑगस्ट

प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करणे - ६ ऑगस्ट

कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करणे - ७ ते ९ ऑगस्ट

शैक्षणिक वर्षाला सुरुवात - १ ऑगस्ट

प्रवेशाचा कट ऑफ दिनांक - १४ ऑगस्ट

'सीईटीसाठी शुल्क नाही'

सीईटीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कोणत्याच प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. तर, नीट परीक्षा दिलेल्या आणि सीईटीसाठी नोंदणी न केलेल्या सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ८०० रुपये; तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ६०० रुपये आणि एनआरए गटातील विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

https://ph2018.mahacet.org/staticpages/homepage.aspx

   

Image result for click here gifhttp://vidyarthimitra.org/rank_predictor

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------