Medical Admissions 2019-20

Medical Admissions 2019-20

‘होमिओपॅथ’साठी ‘मॉडर्न फार्मोकॉलॉजी’चे प्रवेश सुरू

PUBLISH DATE 28th June 2018

राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथीच्या डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी 'मॉडर्न फार्मोकॉलॉजी'चा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने या अभ्यासक्रमासाठीची राज्यातील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्याकरिता आरोग्य विद्यापीठाकडे संबंधित डॉक्टरांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

या करिता www.muhs.ac.in या वेबसाइटवर संपर्क साधावा लागणार आहे. या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी माहिती दिली. 'अॅलोपॅथी अर्थात, आधुनिक औषधशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी होमिओपॅथीच्या तज्ज्ञांना महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियमांतर्गत महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. राज्यातील महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडे नोंदणी केलेल्या ४० हजार डॉक्टरांसाठी २०१८-१९ या वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. हा अभ्यासक्रम एका वर्षाचा असेल. होमिओपॅथीचे डॉक्टर या अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र ठरणार आहेत. प्रत्येक उमेदवाराने पसंतीक्रमासाठी कमीत कमी एक, तर जास्तीत जास्त २४ प्राधान्यक्रम भरणे आवश्यक आहे. एकदा दिलेल्या पसंतीक्रमात नंतर बदल करता येणार नाही. या व्यतिरिक्त कोणतीही गुणवत्ता विचारात घेतली जाणार नाही. सध्या राज्यातील २४ सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे,' अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली.

केवळ महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडे नोंदणीत असलेल्या सेवा ज्येष्ठतेचाच गुणवत्तेसाठी विचार केला जाईल. अर्जदारांची संख्या वाढल्यास संलग्नित मेडिकल कॉलेजची संख्या वाढविण्यात येईल. विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या वेबसाइटवर माहितीसाठी प्रवेशपत्र उपलब्ध केले आहे; तसेच प्रवेशप्रक्रियेच्या शुल्कासह अटी यांची माहिती देण्यात आली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, मिरज, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, यवतमाळ आदी ठिकाणच्या मेडिकल कॉलेजचा समावेश आहे. त्यात पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेज; तसेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च कॉलेज या कॉलेजमध्ये प्रवेश होणार आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इ. ११ वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

DTE इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

बऱ्याचदा विद्यार्थी हे कॉलेजेस व ब्रांचेसची निवड ही विचार न करता भरतात किंवा प्रचलित कॉलेजेस किंवा इनटनेट कॅफेच्या आधारे कॉलेजेस व ब्रांचेसला प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम देतात त्यामुळे त्यांना पुढील १० वी नंतर विद्यार्थ्यांना २ वर्षे व १२ नंतर इंजिनीरिंगची ४ वर्षे मनस्ताप सहन करावा लागतो, याचा परिणाम पुढील प्लेसमेंट वर पण होतो.

त्यामुळे ११ वीचा (आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी) व १२ नंतर इंजिनीरिंग व फार्मसीचा ऑपशन फॉर्म हा विचारकरून काळजीपूर्वक भरायला हवा.

या करिता विद्यार्थी मित्र या शैक्षणिक वेबपोर्टलने अतिशय सोप्या पद्धतीने कट-ऑफ विनामूल्य एका क्लिकवर तुमचे मार्क व गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात अॅडमीशन पाहिजे इ. अनेक बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ११ वी (FYJC) प्रवेश करिता १ ते १० ज्यु. कॉलेजेसची यादी व १२ वी नंतर इंजिनीरिंग करिता अॅडमीशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस व कोर्सेसची ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी उपलब्ध करून दिले जाते.

११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.

त्याचबरोबर इंजिनीरिंग व फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस यादी एका क्लिकवर गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात, कोणत्या युनिवर्सिटी अॅडमिशन पाहिजे, त्याचबरोबर प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम अशा अनेक ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने http://vidyarthimitra.org/rank_predictor या पोर्टलवर  उपलब्ध आहे.

 

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org/

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------