Vocational Courses Admissions

Vocational Courses Admissions

ITI उत्तीर्ण दहावी, बारावी समकक्ष होणार

PUBLISH DATE 3rd June 2018

ITI उत्तीर्ण दहावी, बारावी समकक्ष

आयटीआय परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक अर्हता दहावी व बारावीच्या समकक्ष आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार दहावीची परीक्षा न दिलेल्या अथवा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्याला दहावी उत्तीर्ण झाल्याचे गृहित धरून त्यानुसार क्रेडिट देण्यात येतील. बारावीबाबतही हीच पद्धत अवलंबली जाईल. केवळ त्यासाठी भाषा विषयाच्या परीक्षा द्याव्या लागणार आहेत. 

आठवीनंतर आयटीआयच्या विविध शाखांमध्ये प्रवेश मिळतो. विविध कौशल्य प्राप्त करणाऱ्या या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता दहावी अथवा बारावी उत्तीर्ण म्हणून गृहीत धरली जात नाही. त्यामुळे अनेकदा आयटीआय उत्तीर्ण होऊनही दहावी अथवा बारावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी त्याचा लाभ मिळत नाही. हीच अडचण दूर करण्यासाठी राज्य सरकारने यासंदर्भात नुकताच शासन निर्णय जाहीर केला. यानुसार दहावी अनुत्तीर्ण झालेल्या मात्र आयटीआय पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यापुढे दहावीच्या समकक्ष आणण्यात येईल. त्याप्रमाणे त्यांना क्रेडिट देण्यात येतील. आयटीआयच्या गुणपत्रिकेतील दहावी अनुत्तीर्ण शेरा बदलून 'कौशल्य विकासासाठी पात्र' असे नमूद करण्यात येईल. त्याप्रमाणेच दहावीनंतर आयटीआयचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बारावी उत्तीर्णचा दर्जा बहाल होईल व त्यांना दहावीप्रमाणेच क्रेडिट देण्यात येतील. 

सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयानुसार यापुढे दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना कमाल चार विषयांचे क्रेडिट घेता येतील. विद्यार्थ्यांना आयटीआयमधील कमाल गुणांचे रूपांतर शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी करून घेता येणार आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या बेस्ट ऑफ फाइव्ह योजनेचाही लाभ घेता येणार आहे.

भाषा विषय उत्तीर्ण करणे अनिवार्य 
राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या समकक्ष करण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी शिक्षण मंडळाच्या नियमाप्रमाणे या दोन्ही परीक्षांसाठी दोन भाषा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. तसेच पर्यावरणशास्त्र व ग्रेड विषयांतही उत्तीर्ण होणे आवश्यक असेल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले आहे. 

Click here Details of All  : Entrance Exams 2018

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------