Higher Education

Higher Education

जून महिना ठरणार सीईटींचा

PUBLISH DATE 17th May 2018

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी येत्या जून महिन्यात सहा सीईटी घेण्यात येत आहेत. त्यामुळे येणारा जून महिना हा 'सीईटी' परीक्षांचा राहणार आहे. बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटीसाठी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असल्याचे उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विद्यार्थी मित्र लवकरच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सराव परीक्षा घेणार आहे.

नाव नोंदणी करिता TET    MOCK EXAM REGISTRATION

बीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी होणारी सीईटी ९ आणि १० जूनला होणार आहे. या सीईटीसाठी तब्बल ५३ हजार ६९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकिट २४ मेपासून ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एमएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीला विद्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद दिला आहे. राज्यातून केवळ १ हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा १५ जूनला घेण्यात येणार आहे. बीपीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी होणारी परीक्षा एक जूनला होणार आहे, तर फिल्ड टेस्ट दोन आणि तीन जूनला होणार आहे. यासाठी दोन हजार ६७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे एमपीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा ११ जूनला होणार असून, त्यासाठी ५४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. फिल्ड टेस्ट १२ आणि १३ जूनला होणार आहे.

यंदा बीए-बीएड आणि बीएड-एमएड असे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी सीईटी घेण्यात येणार आहे. या दोन्ही सीईटी २१ जूनला होणार आहेत. दरम्यान, एलएलबी या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सीईटी २२ एप्रिलला झाली असून, सात मे रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अधिक माहिती सीईटी सेल आणि संचालनालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. वेळापत्रकानुसार सीईटी परीक्षा होणार असल्याचे संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी सांगितले.

लॉ सीईटी १७ जूनला

राज्यातील तीन वर्षांच्या लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी सीईटी १७ जूनला होणार आहे. विद्यार्थ्यांना एक जूनपासून हॉल तिकिट डाउनलोड करता येईल. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राज्यात १३ हजार ३६० जागा उपलब्ध आहेत. परीक्षेसाठी सुमारे १९ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अभ्यासक्रम - जागा - विद्यार्थी नोंदणी

एलएलबी (५ वर्षे ) - १६५८१ - ९१२०

एलएलबी - १३३६० - १९०००

बीएड - ३५१७५ - ५३६९२

एमएड - ४३५० - १६४०

बीपीएड - ६८८० - २६७४

एमपीएड - ९४० - ५४७

विद्यार्थी मित्र लवकरच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सराव परीक्षा घेणार आहे.

नाव नोंदणी करिता TET    MOCK EXAM REGISTRATION

VidyarthiMitra.org | Law CET Mock Exam

विद्यार्थी मित्र लवकरच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सराव परीक्षा घेणार आहे.

नाव नोंदणी करिता TET    MOCK EXAM REGISTRATION

पात्रता परीक्षा (टीईटी)

TET    MOCK EXAM REGISTRATION

Read More | NEET UG

Click here Details of All  : Entrance Exams 2018

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------