Higher Education

Higher Education

दहावीनंतर विद्यार्थ्यांकडे करिअर करण्यासाठी अनेक पर्याय

PUBLISH DATE 14th May 2020

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडे करिअर करण्यासाठी अनेक पर्याय असतात. परंतु दहावीनंतर आपण कोणता कोर्स निवडता यावर हे तुमचं पुढील भवितव्य अवलंबून असतं.

दहावीनंतर विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम करू शकतात. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयटीआय अभ्यासक्रमदेखील खूप लोकप्रिय आहेत. आयटीआयमध्ये बरेच ट्रेड असतात, ज्यातून विद्यार्थी त्यांच्या आवडीचे विषय निवडू शकतात. विद्यार्थी नेहमी लोकप्रिय कोर्सकडे धाव घेतात. मग त्या कोर्समधून हजारो मुलं शिक्षण घेतात. त्यातली अनेक बेरोजगारच राहतात. याउलट फुटवेअर टेक्नॉलॉजी, मेटलर्जीसारख्या विषयातून राज्याभरातून अवघी १२० मुलंच दरवर्षी बाहेर पडत असल्याने त्यांना लगेच नोकरी मिळते. काही वेळा या कोर्ससाठी हुशार मुलं प्रवेशही घेत नसल्याने अवघ्या ४० टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळतो आणि त्यांना नोकरीचीही संधी चालून येते. तेव्हा नीट विचार करून पर्याय निवडा....

​आयटीआय अभ्यासक्रम

खूप लोकप्रिय आहेत. आयटीआयमध्ये बरेच ट्रेड आहेत, जे विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार निवडू शकतात. काही लोकप्रिय कोर्स पुढीलप्रमाणे -

-आयटी टर्नर-

आयआयटी मेकॅनिक

-आयटी वेल्डर

-आयटी प्लंबर

-आयटीआय इलेक्ट्रीशियन

डिप्लोमा

दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकी विषयात डिप्लोमा करू शकतात, त्यासाठी दहावीत गणित व विज्ञान विषय विद्यार्थ्यांनी घेतलेले असावेत. हे डिप्लोमा कोर्स ३ वर्षांचे असतात. आम्ही अशा काही डिप्लोमा अभ्यासक्रमांची नावे पुढे देत आहोत.

-डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग

-डिप्लोमा इन टेक्सटाइल इंजीनियरिंग

-डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग

-डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग

-डिप्लोमा इन सिविल इंजीनियरिंग

-डिप्लोमा इन आयसी इंजीनियरिंग

-डिप्लोमा इन ईसी इंजीनियरिंग

-डिप्लोमा इन माइनिंग इंजीनियरिंग

या डिप्लोमा अभ्यासक्रमांनंतर विद्यार्थ्यांना थेट इंजिनीअरिंगच्या पदवीला प्रवेश मिळतो.

​​सायन्स

पीसीएमबी - बारावीतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या चारही विषयांवर आधारित बायो केमिस्ट्री, बायो मेडिकल इंजिनीअरिंग, बायो टेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, फार्मसी अशा विषयांकडे जाता येतं.

पीसीएम - या विषयांनुसार आर्किटेक्चर, डिफेन्स, नेव्ही, इंजिनीअरिंग, पायलट ट्रेनिंग, टेक्नॉलॉजीकडे वळता येतं.

पीसीबी - मेडिकल, व्हेटर्नरी सायन्स अॅण्ड अॅनिमल हजबण्डरी, पॅरामेडिकल कोर्सेस, अॅग्रीकल्चर सायन्स अशा विषयांसाठी हा ग्रुप उपयोगी पडतो.

एव्हिएशन, फूड सायन्स, फोरेन्सिक सायन्स, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, लाइफ सायन्स, मॅथमेटिक्स यात पदवी अभ्यासक्रम करता येतो.