Scholarships

Scholarships

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरु

PUBLISH DATE 6th January 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

विद्यापीठाच्या चारही शिष्यवृत्तींसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी २५ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाकडून देण्यात आली. या शिष्यवृत्तींमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होण्यास हातभार लागणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत संलग्न कॉलेज आणि विद्यापीठ विभागातील अव्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आहेत. त्यात क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले अर्थसाह्य योजना, आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसाह्य योजना, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती या योजनांचा समावेश आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून संबंधित महाविद्यालय अथवा विद्यापीठ विभाग यांच्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यार्थी दोन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र असल्याने एकापेक्षा जास्त शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा असल्यास एकाच वेळी अर्जातील योग्य ते दोन पर्याय निवडता येतील.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सादर केलेली अर्जातील माहिती संबंधित महाविद्यालय अथवा विद्यापीठ विभागाने काटेकोरपणे छाननी करून, येत्या जानेवारीपर्यंत विद्यापीठाकडे सादर करावी. मुदतीत आलेल्या अर्जाचा विचार केला जाईल. या शिष्यवृत्तींसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नसल्याचे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने स्पष्ट केले आहे. या शिष्यवृत्तींच्या सविस्तर माहितीसाठी विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन शैक्षणिक विभागाने केले आहे.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs 2020 |

 

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------

 


Related News


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरु
8th February 2024

Scholarship Exam

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरु
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरु
15th December 2023

Sarthi Exam

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरु
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरु
22nd November 2023

Scholarships To Study In UK