Schools

Schools

'विद्यार्थी दिवस' डाॅ.  बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन

PUBLISH DATE 7th November 2017

आज ७ नोव्हेंबर २०१७
डाॅ.  बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन

अर्थात 

विद्यार्थी दिवस

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन राज्यातील शाळा व महाविद्यालयांत आज  विद्यार्थी दिवस म्हणून साजरा होत आहे, ही एक ऐतिहासिक महत्वाची बाब म्हणावी लागेल.   
                ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा सातारा हायस्कूलमध्ये ( राजवाडा चौकातील सध्याचे श्रीमंत छ. प्रतापसिंह राजे हायस्कूलमध्ये ) प्रवेश झाला. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी त्यांचे नाव  भिवा असे होते .या शाळेच्या रजिस्टरला १९१४ या क्रमांकावर बाल भिवाची स्वाक्षरी असून हा ऐतिहासिक दस्तावेज शाळा  प्रशासनाने जपून ठेवला आहे. 
                     डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे.  कारण बाबासाहेबांचे पाऊल शाळेत पडल्यामुळे ते स्वत: सुशिक्षित व प्रज्ञावंत तर झालेच, परंतु  कोट्यवधी दलितांचे व वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. 
                       शिक्षणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व बाबासाहेबांनी पुरेपूर जाणले होते. केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक आणि खर्या अर्थाने सर्वांगीण उन्नती होते याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच बाबासाहेबांनी शिका हा संदेश दिला.हा संदेश केवळ आपल्याच समाजाला दिला असे नव्हे तर जो जो समाज शिक्षणापासून, ज्ञानापासून वंचित आहे, त्या सर्वच समाजाने शिक्षणाचा ध्यास घेऊन ज्ञानी बनावे, प्रज्ञावंत बनावे हा मुख्य उद्देश होता. 
                      शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे , जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय रहाणार नाही असे डाॅ बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. बाबासाहेब आजन्म विद्यार्थी म्हणूनच जगले. विद्येचा वसा त्यांनी  शेवटच्या श्वासापर्यंत जपला. त्यांच्या या विद्वत्तेमूळे जगातील सर्वात मोठे संविधान २ वर्षे ११ महिने १८ दिवस या अल्पकालावधीत पूर्ण करून देशाला बहाल केले व राज्यघटनेचे शिल्पकार ठरले.
                   स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये समाजात त्यांच्या मुळेच रुजू शकली. त्यांचा शाळा प्रवेश एक महत्वपूर्ण व ऐतिहासिक घटना ठरली. त्या प्रवेशाला आज ७नोव्हेंबरला ११७ वर्ष पूर्ण होत आहेत.
                    आजच्या पिढीतील प्रत्येक विद्यार्थी हा देशाचे उज्वल आणि दैदीप्यमान भविष्य आहे. शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग आहे. बाबासाहेबांनी  अठरा   - अठरा तास अभ्यास केला. कठोर परिश्रम घेतले.त्यांच्या मेहनतीची जाण विद्यार्थ्यांना व्हावी व ते एक आदर्श विद्यार्थी बनावेत या हेतुने  ७नोव्हेंबर  हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.

 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा

https://goo.gl/YPjt94