Scholarships

Scholarships

शिष्यवृत्तींसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर

PUBLISH DATE 23rd October 2018

    राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्यामुळे २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षामध्ये उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत.


                   महाडिबीटी पोर्टलद्वारे उच्च शिक्षण विभागाच्या खालील १४ शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येऊ शकतो.
१) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना 
२) डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 
३) राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती 
४) गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती 
५) शासकीय विद्यानिकेतन      शिष्यवृत्ती 
६) एकलव्य आर्थिक सहाय्य 
७) गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य (कनिष्ठ स्तर)
८) गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य (वरिष्ठ स्तर)
९)राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती 
१०) शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती
११) जवाहरलाल नहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती
१२) माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य
१३) स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य 
१४) राज्य शासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 
महाईस्कॉल

अशा योजनांसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला महाडीबीटीच्या वेबसाइटवर नोंदणी करायची आहे. त्यानंतर अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया करण्यासोबतच आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहे,' असे डॉ. माने यांनी सांगितले. शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी लोकतांत्रिक जनता दल, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडियाने पाठपुरावा केला होता.

शिष्यवृत्तीबाबत महत्त्वाचे

- पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम बँकेच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

- शिष्यवृत्तींची माहिती आणि पात्रतेचे निकष महाडीबीटी पोर्टलवर तसेच संचालनालयाच्या www.mahadbtmahait.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. - यंदा विद्यार्थ्यांना अर्ज करताना कॉलेजच्या प्रशासनाने मदत करायची आहे.

- अर्ज १५ नोव्हेंबरपूर्वी भरणे आवश्यक आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शिष्यवृत्तीसाठी आधार संलग्नित बँक खाते आवश्यक नाही, असा काही दिवसांपूर्वी निर्णय दिला. त्यानंतर महाराष्ट्र शिक्षण परिषदेने गणवेश योजनेसाठी आधार संलग्नित बँक खाते उघडण्याचे आदेश दिले होते. यावर वादंग झाल्यानंतर परिषदेने आदेश मागे घेत केवळ बँक खाते आवश्यक असल्याचा निर्वाळा केला. असे असताना उच्चशिक्षण संचालनालयाने शिष्यवृत्तीसाठी आधार संलग्नित बँक खाते आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज्याच्या शैक्षणिक प्रशासकीय यंत्रणांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला खो दिल्याची चर्चा आहे.

महत्त्वाची माहिती

- अर्ज करण्यासाठी आणि माहितीसाठी वेबसाइट - www.mahadbtmahait.gov.in, www.dhepune.gov.in

- अर्ज करण्याची अंतिम तारीख - १५ नोव्हेंबर

- मदतीसाठी टोल फ्री क्रमांक - ०२२-४९१५०८००

Upcoming Entrance Exams Details  2019-20

JEE MAIN 2019

CAT

Exam date:25 Nov 2018

Last date of Application: 19 Sept 2018

https://goo.gl/A625Sk

MAT

Exam date: 02 Sept 2018

Last date of Application: 24 Aug, 2018,

https://goo.gl/xhja4j

GATE

Exam date: 02nd Feb 2019

Last date of Application: 21st Sept 2018

https://goo.gl/r4BX1g

SIAC-CET

Exam date: 4 Nov 2018

Last date of Application: 14 Sept 2018

https://goo.gl/gr3fLV

CDS

Exam date:18 Nov 2018

Last date of Application: 3 Sept 2018

https://goo.gl/s4BsfE

NSTSE

Exam date:16 Dec 2018

Last date of Application:1 Aug 2018

https://goo.gl/SDCYMy

XAT

Management

Exam date:6 Jane 2019

Last date of Application: 30 Nov 2018

https://goo.gl/Jz2Gyb

JEE MAIN

Engineering

Exam date:6 Jan 2018

Last date of Application:30 Sept 2019

https://goo.gl/gBdyF8

CTET