11th Admission 2018

11th Admission 2018

अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी ३१ जुलैला

PUBLISH DATE 27th July 2018

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार कॉलेजांत उपलब्ध जागांची यादी, शुक्रवारी ११ वाजता जाहीर होणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहेत. यानंतर प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या यादीसाठी अल्पसंख्याक कॉलेजात रिक्त असलेल्या इन हाऊस कोट्यातील सुमारे १२ हजार जागा उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.

नागपूर खंडपीठाने यापूर्वी दिलेल्या निर्णयानुसार अल्पसंख्याक कॉलेजांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी सुपूर्द केलेल्या कोट्यातील जागा पुन्हा कॉलेजांकडे सोपवण्यात आल्या होत्या. मात्र, याच प्रकरणावर सुनावणी करताना खंडपीठाने बुधवारी दिलेल्या निर्णयानुसार इन हाऊस कोट्यातील जागा पुन्हा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपसंचालक कार्यालयाने प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार उपलब्ध जागांची यादी २७ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. या यादीतील उपलब्ध जागांनुसार २७ ते २८ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येतील. तिसरी यादी ३१ जुलै रोजी जाहीर झाल्यानंतर या यादीतील विद्यार्थ्यांना ३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत कॉलेजांत जाऊन प्रवेश घेता येणार आहे.

३ ऑगस्ट रोजी तिसऱ्या यादीनंतर रिक्त राहिलेल्या जागांची यादी प्रसिद्ध होईल. यानंतर ७ ऑगस्ट रोजी चौथी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

महत्वाची सूचना 

इ. ११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस चालू शैक्षणिक वर्ष 2018 CAP ROUND 1 & 2 चा कट-ऑफ fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर विनामूल्य उपलब्ध आहे.

2018 CAP ROUND 1 & 2 http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

जास्तीत विद्यार्थांना व पालकांना हि अमूल्य माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना कॅप राउंड ३ चा फॉर्म भरायला मदत होईल

For all latest Govt Jobs 2018Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------