DTE Admissions 2019-20

DTE Admissions 2019-20

BE.BTech, BPharm व इतर कोर्सेसची प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया रद्द

PUBLISH DATE 21st June 2019

नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 जूनपासून सुरू करण्यात येणार असून या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र आदी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्याने अर्ज भरण्याची आणि कागदपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतला आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज भरावे लागणार आहेत. नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 जूनपासून सुरू करण्यात येणार असून या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सीईटी कक्षामार्फत सार पोर्टलवर जनरल रजिस्ट्रेशन व सीईटी पोर्टलवर प्रथम वर्ष अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी राज्यातील सेतू केंद्रांवर करण्यात येत होती. यासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार अर्ज आणि कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सोमवार (ता.17) पासून सुरू झाली होती.

यंदा प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाल्याने सीईटी सेलने अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पाच दिवसांचा कालावधी दिला होता. शुक्रवारी (ता.21) अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता.

अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक बिघाड होउ लागल्याने आणि सेतू सुविधा केंद्रांवर विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड गर्दी होउ लागली होती. विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नसल्याने पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता.

विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सर्व व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी आणि प्रवेश अर्ज भरण्यास सुरूवात केल्यामुळे सर्व्हरवरील भार मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे तक्रारी केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती एकत्रितपणे संलग्नित करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. या आधारावर अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर करणे धोकादायक असल्याचे सीईटी सेलने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने व्यक्त केले. त्याअनुषंगाने सध्या सुरू असलेली ऑनलाईन अर्ज भरण्याची, भरलेल्या अर्जाची व अपलोड केलेल्या गदपत्रांची सेतू सुविधा केंद्रावर पडताळणी करण्याची प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे.

ही प्रक्रिया नव्याने राबविण्याचा निर्णयही प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतला आहे. प्रवेशाचे नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार (ता.24) पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरलेला आहे. अशा सर्वांना पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रियेचा अर्ज सादर करावा लागेल. नव्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत यापूर्वी अर्ज सादर केलेल्या व अर्जासोबत शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे पुन्हा शुल्क देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सीईटी सेलचे आयुक्त यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) Cut-off App https://goo.gl/rT2vXd

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा