Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांची सेवा समाप्त

PUBLISH DATE 29th August 2018

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी उत्तीर्ण न झालेल्या राज्यातील सुमारे आठ हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मार्च २०१९ पर्यंत सेवेत असलेल्या व टीईटी उत्तीर्ण न झालेल्या सर्व शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे या शिक्षकांना कोणतीही संधी मिळणार नसल्याने राज्यातील आठ हजार शिक्षकांना घरी बसावे लागणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ मधील कलम २३ नुसार शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्‍चित करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या शिक्षण परिषदेने राज्यातील शाळांमध्ये शिक्षणांचा दर्जा वाढावा यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे.

राज्य सरकारने नुकताच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमध्ये १३ डिसेंबर २०१३ नंतर नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याचसाठी केंद्र सरकारने अगोदरच २०१५ साली चार वर्ष मुदतवाढ दिली होती. ही विसंगती दूर करण्यासाठी राज्य शासनाने आपला निर्णय बदलला असून आता मार्च २०१९ पर्यंत सेवेत असणारे; परंतु टीईटी परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या सर्व सर्व शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार २०१३ नंतर अल्पसंख्याक शाळांसह इतर शाळांमध्ये नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना येत्या मार्च २०१९ पर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतरही जे शिक्षक ही परीक्षा उत्त्तीर्ण होणार नाहीत, अशा सर्वच शिक्षकांची सेवा संपुष्टात येईल.

'राज्य सरकारने २०१३ नंतर अर्हता नसलेल्या शिक्षकांना पहिल्यांदा सात व नंतर नऊ वर्षांची मुदतवाढ दिली. वास्तविक सरकारला अशी मुदतवाढ देण्याचा अधिकारच नाही. त्याविरोधात आम्ही हायकोर्टात दाद मागितली होती. त्यावर आता हायकोर्टाने राज्याच्या मुख्य सचिवांनाच शपथपत्र देण्यास सांगितले आहे. ३० ऑगस्ट रोजी यावर अंतिम सुनावणी होईल. आमच्या माहितीनुसार राज्यात टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांची संख्या साडेसात ते आठ हजारांदरम्यान असण्याची शक्यता आहे,'असे डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांनी सांगितले.

संधी संपुष्टात ?

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी नुकतीच घेण्यात आली. नियोजनानुसार मार्च २०१९पर्यंत पुन्हा ही परीक्षा होणार नाही. त्यामुळे टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोणतीही संधी मिळणार नसल्याने त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

संख्या नेमकी किती ?

राज्यात टीईटी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या नेमकी किती आहे, याचा तपशील शासनाकडेही उपलब्ध नाही. हायकोर्टाच्या आदेशानंतर ही माहिती गोळा करण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू झाली आहे. मात्र, सध्या त्यात विनाअनुदानित शाळांचा समावेश नाही. काही संघटनांच्या माहितीनुसार ही संख्या आठ हजारांच्या आसपास असली तरी प्रत्यक्षात ती त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे. राज्य शासन आपल्या शपथपत्रात काय माहिती देते हा विषय औत्सुक्याचा ठरणार आहे.

Also Read | CTET 2018

CBSE CTET 2018 eligibility criteria

For all latest Govt Jobs 2018Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org