Schools

Schools

शाळा-महाविद्यालयांचा मुहूर्त ठरला

PUBLISH DATE 31st May 2020

महाराष्ट्र सरकारने एकीकडे जूनमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन सुरू केले होते, मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीत संस्था, पालक यांच्याशी चर्चा करून शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, खासगी क्लासेस सुरू करण्यावर जुलै महिन्यात निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व नियोजन करून १५ ऑगस्टनंतर शाळांची घंटा वाजण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शाळा कधी होणार याकडे पालक, विद्यार्थी म्हणून शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे. शिक्षण विभागाने १५ जूनपासून ग्रीन झोनमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन सुरु केले होते, पण त्यात विरोध होत असल्याने ऑनलाईन, दूरदर्शन, प्रसारभारतीच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे यासह विरोध होत आहे. असे असताना केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत लाॅकडाऊन ५.० असणार आहे, अशी घोषणा शनिवारी (ता.३०) केली. यामध्ये शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, खासगी क्लासेस जून महिन्यात बंदच असणार आहेत.

जुलै महिन्यात राज्य सरकार यासंदर्भात शाळा, पालक, शिक्षक संघटना यांच्याशी चर्चा करून शाळा, महाविद्यालये कसे भरवायचे याचा निर्णय करेल असे नमूद केले आहे. तसेच शाळा, महाविद्यालये सुरू करताना सोशल डिस्टन्स, स्वच्छता, विद्यार्थी सुरक्षा याचा विचार करून कार्यप्रणाली (एसओपी) निश्चित करावी लागणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाला केंद्र शासनाशी सल्लामसलत केल्यानंतरच याचा निर्णय घेता येईल. 

महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाला जुलै महिन्यात निर्णय घेताना कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थी, तेथील विद्यार्थी वाहतूक, शाळा याचाही सखोल विचार करावा लागणार आहे. त्यानंतरच शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे यंदा शाळेची घंटा १५ ऑगस्टनंतरच वाजण्याची शक्यता आहे.

महाविद्यालयांचा मुहूर्त हुकणार? 
'यूजीसी'च्या निर्देशाप्रमाणे प्रथम वर्ष वगळता इतर वर्षातील विद्यार्थ्यांचे वर्ग १ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहेत. मात्र आता सुरक्षेची खबरदारी घेऊन याबाबत जुलै महिन्यात निर्णय घ्यायचा असल्याने राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

सराव परीक्षा २०२० http://mockexam.vidyarthimitra.org/

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

 


Related News


शाळा-महाविद्यालयांचा मुहूर्त ठरला
7th April 2024

DMVS Admission 2024

शाळा-महाविद्यालयांचा मुहूर्त ठरला
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

शाळा-महाविद्यालयांचा मुहूर्त ठरला
30th January 2024

MPSOS Result 2023

शाळा-महाविद्यालयांचा मुहूर्त ठरला
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

शाळा-महाविद्यालयांचा मुहूर्त ठरला
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

शाळा-महाविद्यालयांचा मुहूर्त ठरला
27th December 2023

NIOS Result 2023 Out

शाळा-महाविद्यालयांचा मुहूर्त ठरला
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

शाळा-महाविद्यालयांचा मुहूर्त ठरला
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

शाळा-महाविद्यालयांचा मुहूर्त ठरला
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

शाळा-महाविद्यालयांचा मुहूर्त ठरला
22nd June 2023

JNVST Result 2023