Scholarships

Scholarships

२०१७-१८ इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप

PUBLISH DATE 22nd February 2018

 

 

 

तंत्रशिक्षणातील राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क  शिष्यवृत्ती व  डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८

 

छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या खालील निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विहित अटी व शर्तींनुसार शासकीय व शासन अनुदानित (शासकीय अभिमत विद्यापीठांसह) व खाजगी विनाअनुदानित (खाजगी अभिमत/स्वयं अर्थ सहाय्य विद्यापिठे वगळून) महाविद्यालये/तंत्रनिकेतनांमध्ये शासनाच्या सक्षम प्राधिकऱ्यामार्फत केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणा-या आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 6 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना (व्यवस्थापन कोटयातील प्रवेशित विद्यार्थी वगळून ) शिक्षण शुल्काच्या आणि परीक्षा शुल्काच्या 50 टक्के इतकी शिष्यवृत्ती देण्यात येते.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग अभ्यासक्रम 
पदविका: अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी 
पदवी: अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, वास्तुशास्त्र. 
पदव्युत्तर पदवी: मास्टर ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट / मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मास्टर ऑफ कंम्प्युटर अप्लिकेशन

अधिक माहितीसाठी दिनांक ७ आक्टोबर २०१७ चा शासन निर्णय (201710071235108808) चे अवलोकन करावे.

Click here for Online Application

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८

अ. ज्या विद्यार्थ्यांचे पालक सक्षम प्राधीकाऱ्याने प्रमाणित केल्याप्रमाणे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा ज्यांचे पालक नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता सदर योजना आहे. वसतीगृह निर्वाह भत्ता (Hostel Maintenance Allowance) प्रति विद्यार्थी प्रतिमहा :.

महानगरांतील (मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, औरंगाबाद, नागपूर) प्रवेशित विद्यार्थी

रुपये 3000/-

राज्यातील अन्य ठिकाणी प्रवेशित विद्यार्थी

रुपये 2000/-

ब. ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्प-भूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर नाहीत, परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे (दोन्ही पालकाांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न रु.1.00 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रचलित व नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्षातील १० महिन्यांकरिता रु. ३०००/- निर्वाह भत्ता अदा करण्यात येईल .

अधिक माहितीसाठी दिनांक ७ आक्टोबर २०१७ चा शासन निर्णय (201710071235108808) चे अवलोकन करावे.

टीप : सदर निर्वाहभत्ता हा शैक्षणिक वर्षातील सुटीचा कालावधी वगळुन उर्वरित 10 महिन्यांच्या कालावधीकरिता अनुज्ञेय असेल.

Click here for Online Application

Oops! Something went wrong. This article page did not load correctly. Please refresh the page.